PRAVIN HATKAR
माझ्या या प्रेमाचा चाखून बघ गुलकंद क्षणात मिळेल तुजला सात जन्माचा स्वानंद
Monday, 29 August 2011
ओंजळ माझ्या हाताला
कसा ग 'आवरू,'
तुझ्या दव-अश्रूंना
कसा मी 'सावरू'...!
प्रवीण हटकर
Friday, 5 August 2011
नकळत
मी तिला पहिले
चोरून हसतांना
माझ्या नकळत
मलाच बघतांना.
प्रवीण हटकर
Thursday, 4 August 2011
नात
प्रेमाच नात टिकवण
अगदीच अवघड नसत,
फक्त बुडत असलेल्या जहाजास
तरंगत ठेवण असत.
प्रवीण हटकर
लय.
नाचत्या सरींना
कुठला होता भय,
भिंती खचल्यावरही
पकडत होत्या लय.
प्रवीण हटकर
Wednesday, 3 August 2011
'गुलकंद'
हृदयाच्या ठोक्यामागे
आठवणींचा विसावा,
सखे अपुल्या नात्याचा
'गुलकंद' कसा चाखावा.
प्रवीण हटकर
मीच वारा, मीच पाणी, मीच अग्नी
"मोल" माझे लावणारा कोण आहे,
गाव माझे, शहर माझे, विश्व माझे
'पोरका' मज ठरवणारा कोण आहे.
प्रवीण हटकर
सावधान
सावधान! पावसी थेम्बांनो
राहा माझ्यापासून दूर,
नाहीतर तुम्हाला भिजवेल
माझ्या आसवांचा पूर.
प्रवीण हटकर
Monday, 1 August 2011
काळजाला आज
कोणी पसंत नाही
कालचा तो
भावलेला वसंत नाही .
प्रवीण हटकर
Newer Posts
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)