PRAVIN HATKAR
माझ्या या प्रेमाचा चाखून बघ गुलकंद क्षणात मिळेल तुजला सात जन्माचा स्वानंद
Saturday, 24 December 2011
मी वेदनेचा देव आहे.
मेरी क्रिसमस टू ऑल
भगवान 'येशु 'स अर्पण...
रुबाई प्रकार...
मी वेदनेचा देव आहे
अन येशु माझे नाव आहे.
जस विरह वा संवेदनानी
हे बहरलेले गाव आहे.
-प्रवीण हटकर.
Friday, 23 December 2011
घेना जरा साजणे...
मन झाले प्राजक्त
स्पर्शुनी तुला,
घेना जरा साजणे
सुगंधुनी मला...!
-प्रवीण हटकर.
Monday, 19 December 2011
बघतो रे वादळा...
अशीच वाहत राहा
निरंतर तू माझ्यात,
बघतो रे वादळा
किती जोर तुझ्यात...!
-प्रवीण हटकर.
Sunday, 18 December 2011
ती थोडी स्तब्ध...
आठवणींना कधी आठवण येते का?
हा माझा तिला केलेला प्रश्न आहे,
ती ...थोडी स्तब्ध...मग हसली नि बोलली
कदाचित हेच माझे भाग्य आहे...!
-प्रवीण हटकर.
Wednesday, 14 December 2011
लाडकी सावली...
वेदनेच्या रानात
ती भेटली एकली,
उन असे तोवर होती
माझी लाडकी सावली...
-प्रवीण हटकर.
Tuesday, 13 December 2011
आपलं
आज पुन्हा तुला
एक सांगावस वाटत,
दूर असली तरीही
आपलं म्हणावस वाटत...!
प्रवीण हटकर.
Tuesday, 6 December 2011
गुलाबी चांदणी
तू गुलाबी चांदणी
मी बघतोय तुला निरंतर,
नको होवूस ढगाआड
जीव माझा होतोय खालवर...!
-प्रवीण हटकर.
Friday, 2 December 2011
'फक्त नि फक्त'
लाख मजला माहित आहे
तू खूप खूप दुखी आहे,
अग वेडे! अस कुणी दाखव
जो 'फक्त नि फक्त' सुखी आहे...!
-प्रवीण हटकर
Newer Posts
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)