ह्या पुन्हा गुंतल्या मनास
चिरडून काढा, भोसकून काढा,
मग तुकड्यात विखुरल्या जीवास
काळजातून ओरबाडून काढा...!
-डेबुजी (प्रवीण) हटकर
पुन्हा एकदा मन गुंतवून
मी पुरता फसलो आहे,
जगासवे मीच माझ्यावर
खळाळून हसलो आहे...!
-डेबुजी[प्रवीण] हटकर.
जिथं मन लागतं
तिथे डोकं लाऊ नये,
जिथं डोकं लागतं
तिथे मन लाऊ नये...
किती नाजूक किती हळुवार
सखे तुझं बोलन आहे,
जणू उडणाऱ्या पिसाऱ्याला
अलगद हाती धरणं आहे...
-प्रवीण हटकर