Monday, 30 July 2012

निसर्ग रचना...
मानव जिंकला! मानव जिंकला!
मात निसर्गाला !  देता देता!!

शेत वनराई ! नामशेष नग!
सिमेंटचे जग! झाले आज !!

नैसर्गिक अता! संपला पाऊस!
कृत्रिम पाऊस! पाडलाय!!

चंद्रावर जाता! ना दिसे हिरवे!
दिसले प्लास्टीके! पृथ्वीवर!!

मोठमोठी पूल! केली कारखाने!
नि वृक्षतोडीने! शक्य झाले!!

निसर्ग नियम! पाळता पाळता!
नियमात अता! निसर्ग हा!!

जाग रे  मानवा! जै झालेय हिंस्र!
तै झालेय भस्म! ऐक राजा!

डायनोसोर नि! मोठ मोठे प्राणी!
तै यमसदनी! झाले नष्ट!!

तुझा मूर्खपणा! तुज नडतोय!
भूकंप येतोय! नि सुनामी!

मानवा जाण... तू! निसर्ग घटक!
ना आहे जनक! निसर्गाचा!!

निसर्ग नियम! प्रवीण जाणतो!
प्रवीण जपतो! निसर्गासी!!

-प्रवीण(डेबुजी) हटकर.

 

Saturday, 28 July 2012

गझल...

जाळतो हा श्वास आहे
ना तुझ्या सहवास आहे

आठव प्रिये भेटण्या मी
चुकविलेला तास आहे

एकतर्फी  प्रेम म्हणजे
जन्म कारावास आहे

ताट आहे वाढलेले
नेमका उपवास आहे

संत तत्वे पळताना
आज सर्वा त्रास आहे

प्रवीण(डेबुजी) हटकर.
अकोला
8055213281
अभंग...

पांडुरंग पांडुरंग ! नाम तुझे घेता दंग!
 तन मन सप्तरंग ! रंगीयले!!

दर्शनाची तळमळ! वारकरी धावपळ!
भाव-तरंग निर्मळ! उमटले!!

विठू मज दिसतोय! गालामधी हसतोय!
नजरेत दावतोय! दिव्य-तेज!!

विठ्ठल नामात दंग! प्रवीण रचे अभंग!
उधळून शब्द-रंग! हर्शियतो!!

-प्रवीण(डेबुजी) हटकर.

Friday, 6 July 2012


अभंग...

धाव विठू देवा! विठू देवा धाव!
 संकटात पाव! आज भक्ता!!

मी रे वारकरी!! पंढरी निघालो!!
गाव-गाव आलो! फिरूनिया!!

वरून राजाची! न तमा आम्हासी!
तुझ्या दर्शनासी!! ओढ आम्हा!!

विठ्ठल विठ्ठल! नाम जपुनिया!!
दंग-दंगुनिया! वारकरी!!

सुखावतो तुझ्या! रंगुनी रंगतो!
नामात जगतो!! विठूराया!!

प्रवीण मी झालो! नाम तुझे घेता!!
स्वानंद जाणता!! तुझ्या ठाई!!

-प्रवीण(डेबुजी) हटकर.