Sunday, 30 June 2013

     गा… मल्हार विठ्ठू …

मी मल्हारी गातो ! विठ्ठू गुणगान !
लाभे समाधान ! नाम विठ्ठू  !!

मी मल्हारी भोळा ! देव माझा भोळा !
जपतोया माळा ! विठ्ठू विठ्ठू !!

पिवळ्या उन्हात ! बा… निळ्या नभात !
सावळ्या रंगात ! रूप विठ्ठू !!

मल्हार हाकितो ! मेंढ्या रानोरान !
गात विठ्ठू गान ! आनंदाने !!

प्रवीण मल्हार ! बा… प्रवीण विठ्ठू  !
गा… मल्हार विठ्ठू ! एकनाम !!

-प्रवीण बाबूलाल हटकर 



 

Thursday, 13 June 2013

"विठ्ठू तू प्रचंड"  ….

विठ्ठू अभिमान !
विठ्ठू समाधान !
विठ्ठू गुणगान !
'करू' किती ? !!

विठ्ठू चराचार !
विठ्ठू तू अंबर !
विठ्ठू तू आंतर !
'झाकू' किती ? !!

विठ्ठू तू  आरंभ !
विठ्ठू नाम दंग !
विठ्ठू भक्ती संग !
'रंगू' किती ? !!

विठ्ठू तू अभंग !
"विठ्ठू तू प्रचंड" !
विठ्ठू तू अखंड !
'दिपू' किती? !!

विठ्ठू तूच शक्ती !
विठ्ठू तुझी भक्ती !
बा… तुझ्यात मुक्ती !
'धावू' किती ? !!
(अभंग …. )
-प्रवीण बाबूलाल हटकर