Wednesday, 31 July 2013

        जग शोधलेया …

माणूस माणूस ! शोधतो माणूस !
अंतरी माणूस ! असतांना !!

आभाळ गर्भात ! गा… भू- पाताळात !
कन ते कनात ! शोधलेया !!

ब्रम्हांड उकल ! सागराचे तळ !
अंतरीक्ष स्थळ ! गाठलेया !!

सूर्य प्रखरता ! चंद्र शीतलता !
पूर्ण भूगोलता ! जाणलीया !!

मानवा हरेक  ! कला अवगत !
आज आत्मसात ! तू केलीस !!

खऱ्या अर्थाने तू ! जगी बुद्धिवंत!
होय नामवंत ! एकमात्र !!

पण एक बोलू !  हो तू ओळखले !
स्वतास जाणले ! कधीतरी !!

प्रवीण होऊन ! कुणी बुद्धिवंत !
माणूस जीवांत ! दाखवितो !!

हो आपल्यातच ! आपल्या अंतरी !
होय स्व: अंतरी ! सहजच !!

सांगायचे हेच ! जग शोधलेया !
माणूस जाणू  या ! स्व: अंतरी !!
 (अभंग … )
-प्रवीण बाबूलाल हटकर 

Wednesday, 24 July 2013

      अचानक…

मन आभाळले ! मन वादळले !
धुंद कोसळले ! आसवांत !!

काळजां  कंपन ! वाढले स्पंदन !
थरारले मन ! का? सांग ना !!

रिमझीम सरी ! लपेटल्या जरी !
धडधड उरी ! अशांत का ?!!

अता तू ये मनी! सुनामी होऊन !
काळजां देऊन ! भू- हादरे !! 

हो! मी आता स्तब्ध ! होऊन प्रारब्ध !
आक्रोशले शब्द ! ऐकताना !! 

वीज कडाडली ! मन हादरून !
बघा काजळून ! प्राणज्योत !! 

सुसाट प्रवीण ! बेफाम प्रवीण !
स्तब्धला प्रवीण ! अचानक !!

-प्रवीण बाबूलाल हटकर 

Tuesday, 9 July 2013

विठ्ठू मुक्तीमार्ग …
      अभंग

विठ्ठू तू आरसा !
विठ्ठू तू वारसा !
वारकऱ्यां जसा !
संजीवन !!

विठ्ठू माझा जीव !
विठ्ठू माझा शिव !
विठ्ठू जीव-शिव !
एकसम !!

विठ्ठू तू निसर्ग !
विठ्ठू आम्हा स्वर्ग !
विठ्ठू मुक्तीमार्ग !
एकमात्र !!

-प्रवीण बाबूलाल हटकर. 

Monday, 8 July 2013

      "कफल्लक"चं …

तसं माझ्याकडे…
देण्यासारखे आहे तरी काय ?
थोडासा प्रकाश…  तेजोमय सूर्यास ,
थोडीशी शीतलता….  लख्ख चंद्रास ,
थोडीशी हवा… बेफाम वाऱ्यास ,
थोडेसे टीमटीमने… हसऱ्या  चांदण्यास,
थोडेसे अश्रू … मुसळधार पावसास,
थोडीशी उर्जा … कडाडणा-या विजेस,
एक छोटासा कन … परिपूर्णतेकडे वळणार-या ब्रम्हांडास,
एक छोटीशी  प्रेरणा … सक्षमतेकडे नेणाऱ्या दुर्बलास  
एक छोटीशी जाणीव … असंख्य जिवंत करणार-या जाणीवास,
 हो… हल्ली !!!
तशी … माझी ओळख केवळ "कफल्लक"चं  …

 -प्रवीण बाबूलाल हटकर .