Saturday, 15 August 2015

बुद्धीत प्रचंड 
स्मरणी अखंड ! 
व्याप्तीत ब्रम्हांड 
वक्रतुंड  !! 


तुझ्या नामे काम 
दिव्य तुझे नाम !
तूच चारीधाम 
वक्रतुंड !!




Wednesday, 15 July 2015

परम तत्वाय  परम सत्याय !
परम जीवाय  नमो नम: !!

परम कर्माय  परम मर्माय !
परम धर्माय  नमो नम: !!

सत्यार्थ शिवाय  तत्वात शिवाय !
परम शिवाय  नमो नम : !!

मृत्यूतही शिव  जिवातही शिव !
सर्वार्थात शिव नमो नम : !!

आनंदात  शिव स्वानंदात शिव !
सदानंद शिव नमो नम !!
(अभंग … )
- प्रवीण बाबूलाल हटकर 

Wednesday, 17 June 2015

मन हे जाहले , पांडुरंग …

हृदय स्वाधीन
तुझ्या मी आधीन
होऊनिया लीन
पांडुरंग !!


ऐसे हे घडले
श्री वेड जडले
मन हे जाहले
पांडुरंग !!


घेऊन जा आता
प्राण जाता जाता
तुझ्यासवे  दाता
पांडुरंग !!

(अभंग … )

-प्रवीण बाबूलाल हटकर . 

Thursday, 11 June 2015

     अभंग … 

श्री भक्तीत हवी  
प्रेमळ  भावना !!
निर्मळ प्रार्थना
अंतरित !!

श्री त्यास टाळतो 
जो दिना हिणतो ! 
जो भेद जाणतो 
माणसात !!

श्री ची अनुभूती 
आंतर जागृती !
आंतर विकृती 
नाशती हो !!

- प्रवीण बाबूलाल हटकर 



Friday, 6 February 2015


अंतरंग ... 
अभंग... 

गजानन अंतरंग  ! नाम तुझे घेता दंग!
जीवनाला सप्तरंग ! लाभलेया !!

दर्शनाची तळमळ ! वारकरी धावपळ !
भाव अंतरी निर्मळ ! प्रसवले !!

बाबा मज दिसतोय! गालामध्ये हसतोय!
नजरेला दावतोय! दिव्य रूप !!

माउली नामात दंग! प्रवीण रचे अभंग!
उधळून अंतरंग! चराचरी !! 

-प्रवीण बाबूलाल हटकर.

Thursday, 29 January 2015

अभंग प्रकार...


माणूस जाणला

माणूस शोधिला

माणूस पूजिला

'मी' पुसता.




'मी' मज कळलो 

काही क्षणापूर्वी 

करुनी तेरवी

'मी' पणाची.



माणूस ना अंगी

देव पूजे व्यर्थ

स्वतास समर्थ

जाणुनिया...

Friday, 9 January 2015

….
अकोल्याचा पहा ! अजब विकास !
उजाड भकास ! परिसर !!

अकोला खड्यात ! कि जिल्हा खड्यात !
सर्वेच पेचात ! पडलेत !!

घाणीचेच झाले ! रे माहेर घर !
भेटीला आहेर ! रोगराई !!

ट्राफिक सिग्नल ! चालू कधी बंद !
चाले अंदाधुंद ! कारभार !!

पिण्यासाठी आहे ! की हे सांडपाणी !
येई आकलनी ! ना कुणाच्या !!

कुठे तोडफोड ! कुठे मारझोड !
कुठे वृक्ष तोड ! चाललेली !!

कुणाच्या झोळीत !  रे उद्योगधंदे !
नी झोळीत छिद्रे ! अकोल्याच्या !!

कुठे हा विकास ! कारखान्यासाठी !
रे स्वच्छतेसाठी ! अकोल्याचा !!

कोठे शोधू आता ! अकोला विकास !
कुणा हा  विश्वास ! ठेऊ आता !!

राजकारण वा ! समाजकारण !
स्वार्थाचे धोरण ! अकोल्यात !!


(अभंग )
- प्रवीण बाबूलाल हटकर