Thursday, 29 January 2015

अभंग प्रकार...


माणूस जाणला

माणूस शोधिला

माणूस पूजिला

'मी' पुसता.




'मी' मज कळलो 

काही क्षणापूर्वी 

करुनी तेरवी

'मी' पणाची.



माणूस ना अंगी

देव पूजे व्यर्थ

स्वतास समर्थ

जाणुनिया...

Friday, 9 January 2015

….
अकोल्याचा पहा ! अजब विकास !
उजाड भकास ! परिसर !!

अकोला खड्यात ! कि जिल्हा खड्यात !
सर्वेच पेचात ! पडलेत !!

घाणीचेच झाले ! रे माहेर घर !
भेटीला आहेर ! रोगराई !!

ट्राफिक सिग्नल ! चालू कधी बंद !
चाले अंदाधुंद ! कारभार !!

पिण्यासाठी आहे ! की हे सांडपाणी !
येई आकलनी ! ना कुणाच्या !!

कुठे तोडफोड ! कुठे मारझोड !
कुठे वृक्ष तोड ! चाललेली !!

कुणाच्या झोळीत !  रे उद्योगधंदे !
नी झोळीत छिद्रे ! अकोल्याच्या !!

कुठे हा विकास ! कारखान्यासाठी !
रे स्वच्छतेसाठी ! अकोल्याचा !!

कोठे शोधू आता ! अकोला विकास !
कुणा हा  विश्वास ! ठेऊ आता !!

राजकारण वा ! समाजकारण !
स्वार्थाचे धोरण ! अकोल्यात !!


(अभंग )
- प्रवीण बाबूलाल हटकर