Wednesday, 17 June 2015

मन हे जाहले , पांडुरंग …

हृदय स्वाधीन
तुझ्या मी आधीन
होऊनिया लीन
पांडुरंग !!


ऐसे हे घडले
श्री वेड जडले
मन हे जाहले
पांडुरंग !!


घेऊन जा आता
प्राण जाता जाता
तुझ्यासवे  दाता
पांडुरंग !!

(अभंग … )

-प्रवीण बाबूलाल हटकर . 

Thursday, 11 June 2015

     अभंग … 

श्री भक्तीत हवी  
प्रेमळ  भावना !!
निर्मळ प्रार्थना
अंतरित !!

श्री त्यास टाळतो 
जो दिना हिणतो ! 
जो भेद जाणतो 
माणसात !!

श्री ची अनुभूती 
आंतर जागृती !
आंतर विकृती 
नाशती हो !!

- प्रवीण बाबूलाल हटकर