PRAVIN HATKAR
माझ्या या प्रेमाचा चाखून बघ गुलकंद क्षणात मिळेल तुजला सात जन्माचा स्वानंद
Thursday, 27 October 2011
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा...!
एक करूया जात, धर्म, कुल
सारे जपूया संस्कृतीचा ठेवा,
उजळूनी चराचरातील अंतकरण
चला पेटवूया विश्वरूपी दिवा...!
-pravin hatkar
Wednesday, 5 October 2011
आरसा
आरशासारखा मी
आरसा झालो,
भेटले मज जसे ते
मी तसा झालो...!
-प्रवीण हटकर.
Saturday, 24 September 2011
हृदयाच्या ठोक्यामागे
आठवणींचा विसावा,
सखे अपुल्या नात्याचा
'गुलकंद' कसा चाखावा...!
प्रवीण हटकर
Wednesday, 21 September 2011
पान
मी जरी ह्या जगास सोडून गेलो
तीचे अश्रू ओघळणारच असही नाही,
बहरलेल्या झाडातील एखाद पान गळता
मग! त्यावर झाड शोक करेलच असही नाही...!
[माझ्या गुलकंद चारोळी ब्लोग वरून...] -प्रवीण हटकर.
-प्रवीण हटकर.
Thursday, 8 September 2011
दर्पण
मंगल तुझ्या वाढदिवशी
काय करू अर्पण,
हृदयात ठेवले कोरून
सखे तुझे दर्पण...!
-प्रवीण हटकर
Wednesday, 7 September 2011
प्रत्येक दिवस उजाडतो
एक नविन आशा घेउन;
प्रत्येक रात्र गोंजारतेय
मनात नवे स्वप्न ठेउन...
-प्रविण हटकर.
Monday, 5 September 2011
थेंब...
कसं तूला सांगु
माझ तूझ्यावरिल प्रेम,
ओठात अडणारे शब्द
डोळ्यात दाटलेल थेंब...
प्रवीण हटकर
Newer Posts
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)