Saturday, 31 March 2012

अभंग रचना...

 जीवन शोधता! शोधता जीवना!
पाहतो वेदना! साऱ्या ठाई!!

चक्र प्रवाहात! जीवन जगून!
बालक, तरुण! झालो वृध्द!
    
शोधार्थ जीवना! फिरुनी पाहतो!
बालक मी होतो! त्या-समयी!!

बाबांचा अभ्यास! आईची अंगाई!
होती नवलाई! भावंडांची!!

तरुण समयी! जीवन गणित!
बदलली रीत! वागण्याची!!

शोधायचे होते! माझेच अस्तित्व!
करुनी प्रस्ताव! भविष्याशी!!

शिकुनी झालोय! मोठा ब्यारीस्तर!
वाट खळतर! काढूनिया!!

कर्माशी इमानी! नाही बेईमानी!
करुनी सफाई! अन्यायाची!!

निवृत्त  झालोया! सत्कार हि झाला!
गौरवाने केला! मान मोठा!!

अजूनही आहे! खंत जीवनाची!
कळी प्रवासाची! ना कळाली!!

जगतो कशाला! जागतो कशाला!
व्यर्थच कशाला! रमतोय!!

हसणे रडणे! रुसणे फसणे!
उगाच सजणे! कुणासाठी!!

जन्म जगण्यासाठी! मृत्यू मरण्यासाठी!
जणू फसण्यासाठी! डाव सारा!!

स्वताच प्रवीण! होवुनी बोलतो!
विचार मांडतो! समक्ष हा!!

 गुंतुनीया ऐका! साखले विनतो!
जीव हा जगतो! जीवासाठी!!
         -प्रवीण हटकर.
  


  
        
          
अभंग रचना...

 जीवन शोधता
शोधता जीवना
पाहतो वेदना
साऱ्या ठाई

चक्र प्रवाहात
जीवन जगून
बालक, तरुण
झालो वृध्द
    
शोधार्थ जीवना
फिरुनी पाहतो
बालक मी होतो
त्या-समयी

बाबांचा अभ्यास
आईची अंगाई
होती नवलाई
भावंडांची

तरुण समयी
जीवन गणित
बदलली रीत
वागण्याची

शोधायचे होते
माझेच अस्तित्व
करुनी प्रस्ताव
भविष्याशी

शिकुनी झालोय
मोठा ब्यारीस्तर
वाट खळतर   
काढूनिया

कर्माशी इमानी
नाही बेईमानी
करुनी सफाई
अन्यायाची

निवृत्त  झालोया
सत्कार हि झाला
गौरवाने केला
मान मोठा

अजूनही आहे
खंत जीवनाची
कळी प्रवासाची
ना कळाली

जगतो कशाला
जागतो कशाला
व्यर्थच कशाला
रमतोय

हसणे रडणे
रुसणे फसणे
उगाच सजणे
कुणासाठी

जन्म जगण्यासाठी
मृत्यू मरण्यासाठी
जणू फसण्यासाठी
डाव सारा.

स्वताच प्रवीण
होवुनी बोलतो
विचार मांडतो
समक्ष हा

 गुंतुनीया ऐका
साखले विनतो
जीव हा जगतो
जीवासाठी

-प्रवीण हटकर.
  

जीवन   
  


  
        
          

Monday, 19 March 2012

       तू 'ब्रम्हांड' आहे...!
  
तू नको घेउस!तू नको देऊस!
तू नको होऊस! कुणाचाही!!

तुझ्याकडे आहे! माझ्याकडे आहे!
सर्वांकडे आहे! देण्यासाठी!!

मी नाहीस श्रेष्ठ! तू नाहीस श्रेष्ठ!
नाहीस तो श्रेष्ठ! ऐक माझे!!

उदार पाधार! नकोच विचार!
ठेव तू आचार! स्वच्छ तुझा!!

तूच  ब्रम्ह आहे! तू ब्रम्हांड आहे!
तूच तुझा आहे! शिल्पकार!!

होऊन 'प्रवीण'! कर स्व: विकास!
कळेल जगास! कीर्ती तुझी!!

             -प्रवीण (डेबुजी) हटकर.
                 अकोला.

Saturday, 10 March 2012

  अभंग प्रकार...

पैसा नाही मोठा! पैसा नाही छोटा!
पैशासाठी खोटा! बोले जो-तो!!

पैसा म्हणे बोले! पैसा म्हणे चाले!
पैशा संगे डोले! आज जो-तो!

पैसा झाली माय! पैसा झाला बाप!
विळख्यात साप! डोले जो-तो!!

पैसा माझा धर्म! पैसा माझे कर्म!
ओळखले मर्म! पैशामुळे!!

नाव गंगाराम! फिरे चारी धाम!
तुझ्यावीण काम! कोण करी!!

मी डाकू लुटेरा! हाती चाकू सुरा!
पैसा चोरणारा! तुम्हा प्यारा!

सत्ता माझ्या हाती! मोठी आहे छाती
पैशामुळे ख्याती! झुके जो-तो!!

मन नाही  मला! आत्मा नाही मला!
खर सांगू तुला! मी ईश्वर!!

जो पूजेल आज! डोक्यावर साज!
करील तो राज! मायारूपी!

प्रवीण का स्तब्ध! टाळतोय शब्द!
पैसाच प्रारब्ध! बोलूनिया!!

         -प्रवीण [डेबुजी]हटकर.
                    अकोला.
   
 

   
    

Saturday, 18 February 2012



  // गण गण गणात बोते //
एके दिशी बाबा ! भक्ता संगे आले!
'शीवर'ही झाले! धन्य धन्य!

वज्रभूषण हे! पहाटेच्या वेळी!
अर्ध्य देई तळी! सूर्यास हो!

तेव्हड्यात बाबा! आलेत समोर!
भावूक विभोर! वज्र झाले!

बाबांच्या चरणी! अर्द्यास देवून!
आरती पूजन! केले त्यांनी!

मज मिळे आज! तपचर्या फळ!
अदभूत वेळ! धन्य झालो!

हे जगदीश्वरा! कृपा मज करा!
कल्याण सागरा! मार्ग दावा!

बाबांनी 'भूषणा'! आलिंगन दिले!
 मायेत नाहले! मावूलीच्या!

मस्तकी ठेविला! 'भूषण'च्या हात!
करशील मात! दुराचारी!

कर्म मार्ग केले! रहस्य कथन!
स्वातंत्र्य मनन! मनी सदा!

बाबांचे वचन! सार्थक ठरले!
सर्वत्र जहाले! नाम त्यांचे!

स्वातंत्र्य सेनानी! उठावाचे झाले!
नेतृत्वात केले! कार्य मोठे!

प्रवीण सांगतो! बाबा तुझा हात!
सत्य कर्म जात! फिरे सदा!

मायेची मावुली! प्रेमळ सावली!
नामात गावली! गजानना!   

*श्री गजानन जय गजानन*
              -प्रवीण(डेबुजी) हटकर.
               अकोला.

Tuesday, 7 February 2012

!! गण गण गणात बोते !!
** श्री. गजानन जय गजानन **
बाबा तुझी लीला! रे अपरंपार!
एकतेचा सार! दिला भक्ता!

बसलेत बाबा! एका झाडा खाली!
ज्ञान दीपावली! देत भक्ता!

त्याच झाडावर! होता आगे मोह!
डसण्याचा मोह! झाला कसा!

चिडलेला मोह! उतरला खाली!
तारांबळ झाली! भक्तांमध्ये!

सर्वच पळाले! एकटेच बाबा!
बसे अंगी धाबा! रे मोहाचा!

हे सगळे दृश्य! 'पाहून बंकट'!
बाबांना संकट! त्यास दिसे!

महाराजांना रे! टोचे माश्या काटे!
लाल मनी तुटे! बाबांसाठी!

बाबांचे संकट! बंकटास कळे!
मदतीस पळे! भक्त खरा!
बंकटलालचे! ओळखले मन!
खरे भक्त धन! कळे बाबा!

बाबांचा आदेश! जा आपल्या जागी!
मोहास रे आगी! लालसाठी!

त्याला चावू नका! भक्त आहे मोठा! 
नाही कुणी खोटा! म्हणे बाबा!

आगे मोह उठे! नि झाडा परते!
बंकट पुरते! भारावले!

बाबांची हि लीला! कळे बंकटास!
भक्त झाले खास! आजीवणी!

संकटाच्या वेळी! होई परागंदा!
खोटा आहे धंदा मानवाचा!

शेगावीचा राणा! सांगतोय मंत्र!
मदतीचे तंत्र! स्वानंदाचे!
                           अभंग रचना....
                         -प्रवीण (डेबुजी) हटकर.
                                  अकोला.

Wednesday, 1 February 2012

भ्रम हा भ्रमाचा! ना असे कुणाचा!
भ्रम 'मी' पणाचा! भूल देई!


भ्रमात फुलला! भ्रमात फुगला!
क्षणात फुटला! भ्रम सारा!  


भ्रम ना प्रकाश! भूरळी आकाश!
होयील विनाश! शनार्धात!

सांगतो प्रवीण! नाहीच नवीन!
भ्रमास ना विन!विचारांत!    

         - अभंग  रचना...
       प्रवीण(डेबुजी) हटकर.
            अकोला.