Wednesday, 18 April 2012

              अभंग...
माणूस निर्मिती! निसर्ग जागृती!
कर्माने प्रकृती!घडावया!!

निर्मिकाने बघा! नेमले माणसा!
स्वच्छंदी आरसा! दाखवाया!

मानवा तू कसा! घडलास बाबा!
का? निर्मात्यास बा! नडलाय!!

प्रश्न प्रश्न प्रश्न! किती तुझे प्रश्न!
निर्मात्यास प्रश्न! पडलाय!!

हावरट तुझा! मुळात स्वभाव!
कायम अभाव! समाधानी!!

घर तुला हवे! मोठे राजेशाही!
मनी अंधाराई! दाटलेली!!

त्याच वाईट हो! नि माझे चांगले!
झोडीत छीदरे! पडो त्याच्या!

झाडांची कटाई! कागद छपाई!
वाटून मिठाई! यशासाठी!

मोठे  कारखाने! दुषीयले जल!
टाकुनिया मल! पाण्यामध्ये!!

शांतीचा संदेश! जगी पोहचाया!
चाचणी कराया! अन्वस्राची!!

मूर्ख मूर्ख मूर्ख! किती मूर्ख पणा!
वाटून घे मना! थोडे तरी!

जगाच्या शांतीस! हिंस्र हत्यार का!
औजार हेच का! शांती साठी!

इतिहास गवा! हे महाभारत!
विनाश विरत! झाला आहे!!

पाहिजे जमीन! तीन गज तुला!
तरी का मोहला! स्वार्थासाठी!!

निर्मात्यास अता! पडलाय प्रश्न!
मानवाने स्वप्न! भंग केले!!

मानव उत्पत्ती! निसर्ग संकट!
प्रश्न हा विकत! निर्मात्यास!

प्रवीण सांगतो! ऐक तू मानवा!
आलाय फतवा! तुझ्या नामे!!

निसर्ग नियम! हिंस्र जेहि  होते!
नामशेष झाले! अता कोण!!

सावध सावध! मानवा सावध!
होयील रे वध! अता तुझा!!

निर्माता निर्मिले! मानवा कर्मिले!
निसर्गा धर्मिले! स्वर्गापरी!!
 -प्रवीण(डेबुजी) हटकर.

Monday, 16 April 2012


             अभंग...

प्रेम समजाया! प्रेमात रंगाया!
प्रेमात जगाया! 'कृष्ण' झालो!!

संवेदन मना! वेदना कळाया!
दुखास झेलाया! 'येशू' झालो!!

शांतीचा संदेश! जगी पोहचाया!
मनी रुजवाया! 'बुद्ध' झालो!!

ज्ञान हीच शक्ती! सत्य जाणुनिया!
ज्ञान वाटावया! 'ब्रम्ह' झालो!!

विश्व उमगन्या! विश्व जाणावया!
विश्वात गुंताया! 'कण' झालो!!

माणूस अंतरी! प्रवीण शोधता!
माणूस दिसता! 'देव' झालो!!

प्रवीण (डेबुजी) हटकर.

Saturday, 7 April 2012

अभंग रचना...

प्रत्येक धर्माला! सत्यार्थ कर्माला!
नैतिक मर्माला! मी पुसले!!

धर्म धर्म धर्म! आहे काय धर्म!
कशासाठी वर्ण! पाळलेत!!

धर्म आहे काय! संकल्पना काय!
उद्देश हा काय! सांगा कुणी!!

म्हणे हा अमका! म्हणे हा टमका!
नाहीच ढमका! कुणी बोले!!


मारुनिया हात! डोक्यावर माझ्या!
मीच मूर्ख राज्या! उद्गारलो!!

तेथुनी निघालो! चक्रात बुडाला!
उगाच पडलो! पेचात ह्या!!


विचारांचे चक्र! मेंदूस ग्रासले!
उगाच पुसले! धर्म गीता!!

तेव्हड्यात मागे! आवाज हा आला!
धर्म भिक्षुकाला! द्या मालक!!

"धर्म ध्या धर्म द्या"! कल्याण होयील!
सुकर होतील! मार्ग तुझे!!

खिशातलं नाणं! भिक्षुकास दिले!
आशीर्वाद दिले! खुल्या हाती!!

थोडे पुढे जाता! अचंबित झालो!
देवूनिया आलो! मी धर्माला!!

धर्म उमगला! धर्म हा जाणला!
पैशात जन्माला! धर्म नवा!!

नवीन युगाचा! फक्त एक धर्म!
पैशाचेच सर्व! भक्त झाले!!

"पैसा हाच धर्म"! वाजवूनी टाळ!
जपतोय माल! पैसा! पैसा!!

   -प्रवीण(डेबुजी) हटकर.

Saturday, 31 March 2012

अभंग रचना...

 जीवन शोधता! शोधता जीवना!
पाहतो वेदना! साऱ्या ठाई!!

चक्र प्रवाहात! जीवन जगून!
बालक, तरुण! झालो वृध्द!
    
शोधार्थ जीवना! फिरुनी पाहतो!
बालक मी होतो! त्या-समयी!!

बाबांचा अभ्यास! आईची अंगाई!
होती नवलाई! भावंडांची!!

तरुण समयी! जीवन गणित!
बदलली रीत! वागण्याची!!

शोधायचे होते! माझेच अस्तित्व!
करुनी प्रस्ताव! भविष्याशी!!

शिकुनी झालोय! मोठा ब्यारीस्तर!
वाट खळतर! काढूनिया!!

कर्माशी इमानी! नाही बेईमानी!
करुनी सफाई! अन्यायाची!!

निवृत्त  झालोया! सत्कार हि झाला!
गौरवाने केला! मान मोठा!!

अजूनही आहे! खंत जीवनाची!
कळी प्रवासाची! ना कळाली!!

जगतो कशाला! जागतो कशाला!
व्यर्थच कशाला! रमतोय!!

हसणे रडणे! रुसणे फसणे!
उगाच सजणे! कुणासाठी!!

जन्म जगण्यासाठी! मृत्यू मरण्यासाठी!
जणू फसण्यासाठी! डाव सारा!!

स्वताच प्रवीण! होवुनी बोलतो!
विचार मांडतो! समक्ष हा!!

 गुंतुनीया ऐका! साखले विनतो!
जीव हा जगतो! जीवासाठी!!
         -प्रवीण हटकर.
  


  
        
          
अभंग रचना...

 जीवन शोधता
शोधता जीवना
पाहतो वेदना
साऱ्या ठाई

चक्र प्रवाहात
जीवन जगून
बालक, तरुण
झालो वृध्द
    
शोधार्थ जीवना
फिरुनी पाहतो
बालक मी होतो
त्या-समयी

बाबांचा अभ्यास
आईची अंगाई
होती नवलाई
भावंडांची

तरुण समयी
जीवन गणित
बदलली रीत
वागण्याची

शोधायचे होते
माझेच अस्तित्व
करुनी प्रस्ताव
भविष्याशी

शिकुनी झालोय
मोठा ब्यारीस्तर
वाट खळतर   
काढूनिया

कर्माशी इमानी
नाही बेईमानी
करुनी सफाई
अन्यायाची

निवृत्त  झालोया
सत्कार हि झाला
गौरवाने केला
मान मोठा

अजूनही आहे
खंत जीवनाची
कळी प्रवासाची
ना कळाली

जगतो कशाला
जागतो कशाला
व्यर्थच कशाला
रमतोय

हसणे रडणे
रुसणे फसणे
उगाच सजणे
कुणासाठी

जन्म जगण्यासाठी
मृत्यू मरण्यासाठी
जणू फसण्यासाठी
डाव सारा.

स्वताच प्रवीण
होवुनी बोलतो
विचार मांडतो
समक्ष हा

 गुंतुनीया ऐका
साखले विनतो
जीव हा जगतो
जीवासाठी

-प्रवीण हटकर.
  

जीवन   
  


  
        
          

Monday, 19 March 2012

       तू 'ब्रम्हांड' आहे...!
  
तू नको घेउस!तू नको देऊस!
तू नको होऊस! कुणाचाही!!

तुझ्याकडे आहे! माझ्याकडे आहे!
सर्वांकडे आहे! देण्यासाठी!!

मी नाहीस श्रेष्ठ! तू नाहीस श्रेष्ठ!
नाहीस तो श्रेष्ठ! ऐक माझे!!

उदार पाधार! नकोच विचार!
ठेव तू आचार! स्वच्छ तुझा!!

तूच  ब्रम्ह आहे! तू ब्रम्हांड आहे!
तूच तुझा आहे! शिल्पकार!!

होऊन 'प्रवीण'! कर स्व: विकास!
कळेल जगास! कीर्ती तुझी!!

             -प्रवीण (डेबुजी) हटकर.
                 अकोला.

Saturday, 10 March 2012

  अभंग प्रकार...

पैसा नाही मोठा! पैसा नाही छोटा!
पैशासाठी खोटा! बोले जो-तो!!

पैसा म्हणे बोले! पैसा म्हणे चाले!
पैशा संगे डोले! आज जो-तो!

पैसा झाली माय! पैसा झाला बाप!
विळख्यात साप! डोले जो-तो!!

पैसा माझा धर्म! पैसा माझे कर्म!
ओळखले मर्म! पैशामुळे!!

नाव गंगाराम! फिरे चारी धाम!
तुझ्यावीण काम! कोण करी!!

मी डाकू लुटेरा! हाती चाकू सुरा!
पैसा चोरणारा! तुम्हा प्यारा!

सत्ता माझ्या हाती! मोठी आहे छाती
पैशामुळे ख्याती! झुके जो-तो!!

मन नाही  मला! आत्मा नाही मला!
खर सांगू तुला! मी ईश्वर!!

जो पूजेल आज! डोक्यावर साज!
करील तो राज! मायारूपी!

प्रवीण का स्तब्ध! टाळतोय शब्द!
पैसाच प्रारब्ध! बोलूनिया!!

         -प्रवीण [डेबुजी]हटकर.
                    अकोला.