Friday, 15 March 2013

व्यर्थ हे जीवन, लालसेच… 

मुठभर अन्न ! पोटासाठी हवे !
चोचले का? हवे ! जादासाठी !!

न जावे आहारी ! लालसा वाईट !
अनीती प्रकट ! मनी होते !!

सुरवात जणू ! भ्रष्टाचारातून !
हिंसाचारातून ! प्रवासते !!

याचे दोन घास ! त्याचे दोन घास !
भ्रष्टाचारी 'मास' ! तोडतोया !!

पोखरू नकोस ! कुर्ताळू ही नको !
माणुसकी नको ! बा… विसरू !!

हा याला, तू त्याला ! ते तुला फसवी !
लालसा फसवी ! एकमेका !!

सुरवात गोड ! लालसा दावते !
शेवट भोवते ! 'कडूच' हो !!

लालसा वाईट ! सांगतो प्रवीण !
व्यर्थ हे जीवन ! लालसेचे !!

-प्रवीण बाबूलाल हटकर .

Wednesday, 13 March 2013

वेळ ना थांबत …


वेळेचा करावा !  बा… सदुपयोग !
ना दुरुपयोग ! तू करावा !!

तू येत क्षणांचे ! स्वागत करुनी !
कार्यास लागुनी ! प्रारंभावे !!

वेळ ना थांबत ! तुझ्या सोबतीला ! 
वेळेच्या गतीला ! तू चालावे !!

वेळेचे महत्व ! गुण जया अंगी !
यशस्वी तो जगी ! हमखास !!

वेळेचे सामर्थ्य ! सत्य कर्म धर्म !
जपतील मर्म ! सदोदित !!

वेळ कुणाचीही ! नाहीच गुलाम !
वेळेचे गुलाम ! आज जो तो !!

वेळ तुझ्यासाठी ! तू न थांबलास !
बा … ती  दुसर्यास ! मिळतेया !!

वेळ आहे मोठी !वेळ नाही छोटी
वेळेची तू खोटी ! ना… करावी !!

नुकसान तुझे ! ना होत वेळेचे !
सत्य जीवनाचे ! घे… जाणून !!

वेळेचे महत्व ! जानुनी कार्यार्थ !
प्रवीण समर्थ ! बा… जाहला !!

 -प्रवीण बाबूलाल हटकर . 

Monday, 11 March 2013

तू 'ब्रम्हांड' आहे...!
  

तूच  ब्रम्ह आहे!
तू ब्रम्हांड आहे!
तूच तुझा आहे!
शिल्पकार!!

होऊन 'प्रवीण'!
कर स्व: विकास!
कळेल जगास!
कीर्ती तुझी!!

-प्रवीण बाबूलाल  हटकर.
असे घडावे की …

असे घडावे की ! आत्मज्ञान व्हावे !
उद्देश कळावे ! बा… जन्माचा !!

हा उंच डोंगर ! गगन परीघ !
ओढतोया रेघ ! क्षितीज का ? !!

दुख्खात आसवे ! सुखात हसू का ? !
संघर्ष येतो का? ! ह्या जीवनी !!

आभाळ गर्भात ! उठताच कळ !
व्याकुळतो तळ ! भू तुझा का? !!

माणूस म्हणुनी ! तू आला जगी !
शोधण्या का त्रागी ! माणसास !!

शोध तुझा तुला ! तुझ्यात कळेल !
तेव्हा साकारेल ! उद्देश हा !!

उंदीर लहान ! इवलासा जीव !
पाहुनिया कीव ! येते आम्हा !!

पोखरुनी जेव्हा ! डोंगरास येतो !
अचंबित होतो ! जो तो तया  !!

 सुगरणी तुझा ! खोपा ना कळाला !
उद्देश हा कळाला ! स्वच्छंदित !!

कुणी माणसात ! माणूस शोधतो !
बा… देव शोधतो ! देवळात !!

शोधण्या तुजला ! नको भटकंती !
आत्मजाण अंती  ! आत्मज्ञान !!

प्रवीण उद्देश ! बा … फलित व्हावा  !
स्व: जन्म कळावा ! जीवा तुला!!
-प्रवीण बाबूलाल हटकर .

Monday, 4 March 2013

श्री संत गजानन महाराज यांच्या पावन प्रकट दिना निमित्य समस्त भक्त-गणास प्रेमळ शुभेच्छा।

प्रकटुनी ये पुन्हा ….

(भावगीत/ आरती …)

प्रकटुनी ये पुन्हा ! समर्थ गजानना !
भक्त हाका देतोय ! श्री. देवा गजानना !!

गण गण जोडीले ! गणात बोवूनिया !
मानवता मंत्रास ! मनात रुजुनिया !
एक आहे माणूस! उमजले या मना!! …
(प्रकटुनी ये पुन्हा …)

बाप तू संयमाचा ! माय तू ममतेची !
भक्तासाठी रुपिली ! काया पांडुरंगाची !
कण ते ब्रम्हांडात ! तूच तू गजानना !!
(प्रकटुनी ये पुन्हा…)

विना आग चिलीम ! पेटवून दाविली !
भक्त रक्षणासाठी ! नर्मदाही धाविली !
चमत्कार पाहुनी ! दंग दंगले जना !
(प्रकटुनी ये पुन्हा …)

येत प्रकटदिनी ! आनंदाचा सोहळा !
वारकरी जल्लोष ! शेगावी गोतावळा !
ढोल ताशे मृदुंग ! मनी जप गजानना !!
प्रकटूनी ये पुन्हा…)

नासाग्र तुझी बुद्धी ! ब्रम्ह तू ज्ञानवंता !
विष्णू महेश तू ! माउली जाणवंता !
ब्रम्हांड नायक तू ! श्री स्वामी गजानना !!
(प्रकटुनी ये पुन्हा…)

- प्रवीण बाबूलाल हटकर .
मो. ८० ५५ २१३ २८१ . 
     अकोला 

Saturday, 2 March 2013

आभाळ आभाळ …
(भावगीत)
आभाळ आभाळ, प्रितीचं आभाळ
ओलीचिंब सर…  चिंब रानमाळ …

मनी थरथर, श्वास भरभर… 
थोडासा उसासा, थोडासा आधार. 
घट्ट घट्ट मिठी…  इरादा हा टवाळ …
(आभाळ ….)

अवघड क्षण, एक तन मन
तू ग देवी रती, मी देव मदन
धुंद यौवनाची…  अंगी दिव्य-जाळ  … 
(आभाळ …)

हर्ष स्पंदनात, हर्ष आसवांत 
तुझी माझी साथ, हर्ष जीवनात
दुखे पाझरून…  सुखास सांभाळ …
(आभाळ …)

-प्रवीण बाबूलाल हटकर . 



Wednesday, 27 February 2013

मान-अपमान

मान अपमान ! थोडस जानुया !
संपूर्ण जागुया ! योग्य काय? !!

मनाने मनाचा ! केलेला आदर !
सर्वांग साभार ! मान तोचि !!

मनी अनादर ! आहे अपमान !
नको अभिमान ! खोटा-नाटा  !!

मुखी  वाह वाह ! मनातून  द्वेष !
मान नाही क्लेश ! ऐक राजा !!

स्वार्थ सुखासाठी ! पुढे करतील !
दुषणे देतील ! पाठीमागे !!

मान तुम्हा मिळे ! मान तुम्ही देता !
काच ? तुम्ही देता ! अपमान !!

मान-अपमान ! जाणणे हे सोपे !
आचरणी जपे ! सदाचार !!

प्रवीण तो झाला ! सत्य हे जाणून !
मान-अपमान ! कार्यातून !!
-प्रवीण बाबूलाल हटकर .