Monday, 15 April 2013



माणूस जाणला … 


माणूस जाणला !माणूस शोधिला !
माणूस पूजिला ! 'मी' पुसता  !!


'मी' मज कळलो ! काही क्षणापूर्वी ! 
करुनी तेरवी ! 'मी' पणाची !!


माणूस ना अंगी ! देव पूजे व्यर्थ !
स्वतास समर्थ ! जाणुनिया !!


- प्रवीण बाबूलाल हटकर 

अभंग ..

दाढ अकलेची ! येता वर्षे झाली !
ना समज आली ! कवडीची !!

धोतर सदरा ! दिसे तो साजरा !
पेहेराव बरा ! अंग झाके !!

फ्याशन ने  राजा ! कमालच केली !
अर्धी नग्न झाली ! तरुणाई !!

जिथे झाकायचे ! तिथेच फाटले !
उगाच झाकले ! तोंडास का? !!

फ्याशन नावान ! लावली ठिगळे !
सजती माकडे ! रोज नवी !!
  
बापो...हो! जपा ना ! अपुली संस्कृती !
सोडा आता नीती ! अविचारी !!

उद्देश! फक्त हा ! वापरा संपूर्ण ! 
अंग झाका पूर्ण ! कपड्यांत !!

जुने-नवे असो ! पण असो योग्य   
प्रयोग सुयोग्य ! तुम्ही करा !!

                               -डेबुजी (प्रवीण) हटकर
                                      अकोला.  

गजानना ओढ ...

गजानना ओढ ! तुझ्या दर्शणाची !
कळी जीवनाची ! फुललीया !!

नको होऊ रुष्ठ ! बाबा आम्हावर !
तुझीच लेकरं ! पितामहा !!

मूळ तू झाड तू ! फुल तू पान तू !
चराचरात तू ! दिगंबरा !!

पाठीवर हात ! ठेव सदोदित !
जीवन वा अंत ! तुझ्या लीन !!

बाबा बाबा बाबा ! गजानन बाबा !
हाक देई बाबा ! तुझा भक्त !!

-प्रवीण बाबुलाल हटकर.
  अकोला .

Friday, 12 April 2013

आसक्त…  विरक्त…

 आसक्त, विरक्त ! परिणाम असे !
गा… जीवन जसे ! बदलले !!

लोभ माया राग ! आसक्त संगम !
आसक्त उगम ! मोहतोया !!

बा… जवळ नाही ! पण  हवी आहे !
तो आसक्त आहे ! मिळविण्या !!

मग मोहासाठी ! स्वार्थ सुखासाठी !
बा… मिळण्यासाठी ! धडपडे !!

याउलट आहे ! गा…  'विरक्तीगाथा' !
आहे जी अवस्था ! स्वीकारने !!

ईश्वराने दिल्या ! जन्मास आलेल्या !
बा… ह्याची आयुष्या ! जगणे हो !

न मोह न माया ! सुख-दुख एक  !
भूमिका हो एक ! तो विरक्त !!

जन्म-मृत्यू,  मोह- ! माया, सुख-दुख !
तठस्थ ओळख ! एक सम  !!

सहज…  आहे 'त्या' ! स्तिथिचा स्वीकार !
तठस्थ प्रकार  ! विरक्तीचा !!

नाही मिळाल्यास ! आसक्त भोवते !
मत्सर रोवते ! राग-लोभ !!

प्रवीण स्तिथिचा ! स्वीकार करून !
सहज होऊन ! जगतोया !!

-प्रवीण बाबूलाल हटकर .

Thursday, 11 April 2013

एक मुक्त कविता
  -आधार-

कासवा तू…
गोष्टीत जिंकलास !
बरे केले…
नाहीतर,
कामचोरांनी
तुझ्याच हरण्याचा,
तुझा " सहांभूतिमय आधार"
घेतला असता… स्वतासाठी !!!

-प्रवीण बाबूलाल हटकर.

Wednesday, 3 April 2013

कृतघ्न, कृतज्ञ…

कृतघ्न, कृतज्ञ ! फरक जाणुया !
फरक पाहूया ! दोहोतला !!

अगदीच सोपा ! फरक यातील !
चक्कर जातील ! सहजंच!!

बा… उपकाराची ! जया जाणं आहे !
नी आभार आहे ! तो… कृतज्ञ !!

कृतज्ञता येते ! स्वच्छ मनातून !
बा… भावनेतून ! आदराच्या !!

घेत उपकारा ! करुनी परत !
आभार व्यक्तत ! तो कृतज्ञ !!

गा…  उपकाराची ! ना जाणीव जया !
ना आभार तया ! व्यक्तेतेत  !!

उपकार घेत ! विसरून जातो !
कृतघ्न ठरतो ! खर्या अर्थी !!

बा… माणूस तोचि ! जो कृतज्ञ आहे !
व्यक्ततेत आहे ! ऋणजाणं !!

तो माणूस कसा ! जो कृतघ्न आहे !
ऋणास जो आहे ! बा… अजाण !!

प्रवीण जाहला ! कृतज्ञ होवून !
परत फेडून ! ऋणास हो !!

अभंग …
-प्रवीण बाबूलाल हटकर . 

 

Tuesday, 2 April 2013

कुलदेवी आई ….

आई कुलदेवी ! माता महालक्ष्मी !
देवी महालक्ष्मी ! नमो नम: !!

साडे तीन पीठ ! त्यामध्ये तू एक !
धनाचे प्रतिक ! महालक्ष्मी !!

कोल्हापूर धन्य ! धनाचे आगर !
कृपेचा सागर !! तू दाविला !!

आवडीच फुल ! सुंदर कमळ !
सुहास निर्मळ ! बैठीकीस !!

पवित्र या जागी ! कोल्हापुरी वास !
भक्त दर्शनास ! आनंदिले !!

दर्शनीय स्थळ ! कोल्हापूर झाले !
दुरूनीया आले ! भक्तजन !!

महासरस्वती ! महाकाली माता !
मा भवानी माता ! तुझ्यासंगे !!

पहाट दुपार ! रम्य सायंकाळ !
आनंद  सुकाळ ! सदोदित !!

दर्शुनी प्रवीण ! आली अनुभूती !
हर्ष ना मावती ! बा…  गगनी !!

माता माता माता ! आई आई आई !
कुलदेवी आई ! नमो नम: !!

कुलदेवी स्वामिनी  श्री. महालक्ष्मी मातेचे दर्शन घेतल्यावर…

-प्रवीण बाबूलाल हटकर.