Wednesday, 14 August 2013

पांडुरंग पांडुरंग ! रंग दंग अंतरंग !

पांडुरंग पांडुरंग ! बा… विठ्ठल हरी हरी !
तुझ्या विना ना अंतरी ! ध्यास दुजा !!

पांडुरंग पांडुरंग ! उभा चंद्रभागे तिरी !
हात दोन्ही कटेवरी ! युगे युगे !!

पांडुरंग पांडुरंग ! रंग दंग अंतरंग !
स्मरूनी विरले अंग ! स्पंदनात !!

पांडुरंग पाडुरंग ! चढे आम्हा भक्तीरंग !
बोलता, चालता संग ! विठू नाम !!
(अभंग … )
-प्रवीण बाबूलाल हटकर

Tuesday, 6 August 2013

गजानना धावू किती, धावू किती गुरु देवा
दिनरात्र ध्यास तुझा, सहवास तुझा हवा …

बा… भजताच माउली, स्पंदनात भाव नवा
जसा विहारे गगनी, आनंदून पक्षि थवा
शिश झुकता कपाळी , माउलीचा हात असावा
सहवास तुझा हवा …


तूच आता एकमात्र, आम्हा रोगमुक्त दवा …
सहवास तुझा हवा…

 

Friday, 2 August 2013

मी तसाच होतो विरक्त … 

सखे … तुझी एक गुलाबी नजर 
माझ्या नयनी येउन भिडते
अन माझ्या अंतरंगी प्रचंड घंटा नाद उमटतो,
गुंजतो व भिनभिनतोसुद्धा ,
जणू  मी एका प्राचीन शिवालयात युगायुगातून 
द्यानास्त प्रसन्न भावमुद्रेत तुझ्याच त्या नजरभेटीसाठी 
ताठस्त नी  व्याकूळ झालेलो …ध्यानमग्न 
हो मोहिनी ! तो मी तसाच "आसक्त" !!!
जन्मोजन्मीचा 
पण …
सखे ! अशात तुझी एक नकारात्म भावमुद्रा 
माझे हृदय ढगफुटी फाताल्यासारखे होते,
मग सर्वत्र विनाशाच विनाश,
मग जगाव की मराव? हा प्रश्न मनात 
घुटमळू लागतो … 
राहुल ला सोडून जाताना सिद्धार्थ ला सोपे नव्हतेच 
'शून्यातून विश्वव्यापी शुन्याकडे' जाताना शुन्य घरातील 
लीनता… नक्कीच 'बुद्धमय' होती शांततेसाठी 
हो मोहिनी ! मी तसाच होतो विरक्त… 
सुख-दुःखाच्या सीमापार अगदी सहजच  ………  

 -प्रवीण बाबूलाल हटकर. 

Wednesday, 31 July 2013

        जग शोधलेया …

माणूस माणूस ! शोधतो माणूस !
अंतरी माणूस ! असतांना !!

आभाळ गर्भात ! गा… भू- पाताळात !
कन ते कनात ! शोधलेया !!

ब्रम्हांड उकल ! सागराचे तळ !
अंतरीक्ष स्थळ ! गाठलेया !!

सूर्य प्रखरता ! चंद्र शीतलता !
पूर्ण भूगोलता ! जाणलीया !!

मानवा हरेक  ! कला अवगत !
आज आत्मसात ! तू केलीस !!

खऱ्या अर्थाने तू ! जगी बुद्धिवंत!
होय नामवंत ! एकमात्र !!

पण एक बोलू !  हो तू ओळखले !
स्वतास जाणले ! कधीतरी !!

प्रवीण होऊन ! कुणी बुद्धिवंत !
माणूस जीवांत ! दाखवितो !!

हो आपल्यातच ! आपल्या अंतरी !
होय स्व: अंतरी ! सहजच !!

सांगायचे हेच ! जग शोधलेया !
माणूस जाणू  या ! स्व: अंतरी !!
 (अभंग … )
-प्रवीण बाबूलाल हटकर 

Wednesday, 24 July 2013

      अचानक…

मन आभाळले ! मन वादळले !
धुंद कोसळले ! आसवांत !!

काळजां  कंपन ! वाढले स्पंदन !
थरारले मन ! का? सांग ना !!

रिमझीम सरी ! लपेटल्या जरी !
धडधड उरी ! अशांत का ?!!

अता तू ये मनी! सुनामी होऊन !
काळजां देऊन ! भू- हादरे !! 

हो! मी आता स्तब्ध ! होऊन प्रारब्ध !
आक्रोशले शब्द ! ऐकताना !! 

वीज कडाडली ! मन हादरून !
बघा काजळून ! प्राणज्योत !! 

सुसाट प्रवीण ! बेफाम प्रवीण !
स्तब्धला प्रवीण ! अचानक !!

-प्रवीण बाबूलाल हटकर 

Tuesday, 9 July 2013

विठ्ठू मुक्तीमार्ग …
      अभंग

विठ्ठू तू आरसा !
विठ्ठू तू वारसा !
वारकऱ्यां जसा !
संजीवन !!

विठ्ठू माझा जीव !
विठ्ठू माझा शिव !
विठ्ठू जीव-शिव !
एकसम !!

विठ्ठू तू निसर्ग !
विठ्ठू आम्हा स्वर्ग !
विठ्ठू मुक्तीमार्ग !
एकमात्र !!

-प्रवीण बाबूलाल हटकर. 

Monday, 8 July 2013

      "कफल्लक"चं …

तसं माझ्याकडे…
देण्यासारखे आहे तरी काय ?
थोडासा प्रकाश…  तेजोमय सूर्यास ,
थोडीशी शीतलता….  लख्ख चंद्रास ,
थोडीशी हवा… बेफाम वाऱ्यास ,
थोडेसे टीमटीमने… हसऱ्या  चांदण्यास,
थोडेसे अश्रू … मुसळधार पावसास,
थोडीशी उर्जा … कडाडणा-या विजेस,
एक छोटासा कन … परिपूर्णतेकडे वळणार-या ब्रम्हांडास,
एक छोटीशी  प्रेरणा … सक्षमतेकडे नेणाऱ्या दुर्बलास  
एक छोटीशी जाणीव … असंख्य जिवंत करणार-या जाणीवास,
 हो… हल्ली !!!
तशी … माझी ओळख केवळ "कफल्लक"चं  …

 -प्रवीण बाबूलाल हटकर .