Monday, 18 November 2013

अनंत स्वरूप आहे, पांडुरंगा… 

पांडुरंग दरबारी ! जमलेया वारकरी !
बा… भजतोया अंतरी ! पांडुरंगा !!

पांडुरंग कोण आहे ! जीवनाचे सार आहे !
अंतरीची हाक आहे ! पांडुरंगा !!

पांडुरंग काय आहे ! कण ते ब्रम्हांड आहे !
अनंत स्वरूप आहे ! पांडुरंगा !!

आयुष्या गवसलेला ! पांडुरंग अर्थ आहे !
एकमेव सत्य आहे ! पांडुरंगा !!

पांडुरंग पांडुरंग ! गा समर्थ पांडुरंग !
बा… अमुचे  अंतरंग ! पांडुरंगा !!

(अभंग… )

- प्रवीण बाबूलाल हटकर. 

Thursday, 7 November 2013

यशप्राप्ती साठी, आत्मशक्ती जागा…

यश अपयश ! अर्थ हा सहज !
व्याप्तीत गरज ! उमजण्या !!

यश प्राप्ती होणे ! हा नाही शेवट !
ना आहे शेवट ! अपयशा !!

एका यशासाठी ! खुपदा हरतो !
अपयशी होतो ! लाखवेळा !!

बा… अपयशात ! वादळी उत्तरे !
प्रश्नाची भ्रमरे ! त्रास देती !!

बा… जोवर यश ! प्राप्त होत नाही !
गा… तोवर नाही ! मनशांती !! 

यशप्राप्ती होता ! अपयशी दोष !
मनातील रोष ! मिटतात  !!

अपयशी होता ! खचू नका तुम्ही !
हतबल तुम्ही ! नका होऊ !!

अपयश हाच ! बा… शेवट नाही !
राज्या अंत नाही ! प्रयत्नांचा !!

प्रयत्न जोवरी ! तोवरी संघर्ष !
शेवट निष्कर्ष ! बा… प्रयत्नी !!

प्रयत्नी निष्फळ ! अपयशी होतो !
फळप्राप्ती होता ! यशवंत…  !!

यशप्राप्ती साठी ! आत्मशक्ती जागा !
बा… विश्वासी जागा ! स्व: बळास !!

आपण हे करू ! स्व: विश्वास होता !
अपयश जाता ! दूरदूर !!

होता आत्मज्ञान ! आणि आत्मजान !
यशवंत मान ! हमखास !!

यश अपयशा ! सुख दुख मिळे !
जीवनाचे ताळे ! समजण्या !!


(अभंग … )
 -प्रवीण बाबूलाल हटकर 

Wednesday, 6 November 2013

  माझी तू जाणीव, गजानना …


आंतर आवाज ! बा… प्राण सजीव !
माझी तू जाणीव ! गजानना !!

एकरूप चंद्र ! एकरूप सूर्य !
चांदण्या तू सर्व ! गजानना !!

सजीव निर्जीव ! श्रीमंत पामर !
तूच भू, अंबर ! गजानना !!

ज्ञान ब्रम्हरूप ! गा… माउली रूप !
बा… ब्रम्हांडरूप ! गजानना !!

तूच अभिमान ! तूच स्वाभिमान !
नाम समाधान ! गजानना !!

भक्तंचा वारसा ! समाज आरसा !
समर्थ बा… असा ! गजानना !!

मंत्र एकतेचा ! जोडलेया गण !
गणात जोडून ! गजानना !!

(अभंग…  )
-प्रवीण बाबूलाल हटकर  

Tuesday, 5 November 2013

मृत्यू नंतरही, विचार हे अमर..
मोठा धनवान ! आहे तू जगात !
वर मिजाशात ! वागणूक !!

नौकर चाकर ! घोडा गाडी आहे !
जे हवे ते आहे ! तुज पाशी !!

सारे काही केले ! काबीज जे हवे !
यात नाही नवे ! ऐक माझे !!

हिटलर आला ! जग जिंकलेया !
नाच जिकलेया ! मृत्यूस हो !!

धन नाते गोते ! येथेची राहिले !
सोबती ना गेले ! आप्तजन !!

व्यक्ती जातो मात्र ! राहती बा… शब्द !
ओळख प्रारब्ध ! कृतीतून !!

विद्वान आले व ! गेले अनंतात !
राहिले मुखात ! तै विचार !!

गा… विवेकानंद ! संत तुकडोजी !
गा… साने गुरुजी ! ख्यातनाम !!

तात्पर्य एव्हडे ! सांगायचे खास  !
मृत्यू हा जीवास ! ना विचारा !!

विचार ओळख ! कृतीत अमर !
जीव नशवर ! जायील तो !!

प्रवीण विचार ! प्राधान्य विचारा !
बा… अमृतधारा ! जीवनास !!

धन आज आहे ! उद्या न माहिती !
विचाराची  गती ! बा… अमर !! 

मृत्यू नंतरही ! विचार हे अमर !
ना कधी पामर ! जो … विचारी !!

ज्याच्या कडे आहे ! विचारांचे अश्व !
बा… आदर विश्व ! त्याचा करी !!

(अभंग… ) 
-प्रवीण बाबूलाल हटकर 

Monday, 14 October 2013


विश्वास ना येई, वारसा हक्काने … 

बा... दिन-दुबळा
त्यासी म्हनावेत !
स्व:विश्वास  ज्ञात 
ज्यासी नसे !!


स्व: विश्वास  असे 
जया अंतरंगी !
तो निडर जगी 
गा… वावरे  !!

विश्वास फुलतो 
सहजच अंगी !
स्पष्ट ज्याचे जगी 
गा… विचार !!

विश्वास ना येई 
वारसा हक्काने !
येतो हिमतीने
स्व: अंतरी !!   

विश्वासी समर्थ 
लाभे कार्य अर्थ 
ना लाभे कार्यार्थ 
अविश्वासी !!
(अभंग … )

-प्रवीण बाबूलाल हटकर 



Saturday, 12 October 2013

गजल

ऐकण्या-वाचण्या सारखा मी कुठे ?
संग्रही ठेवण्या सारखा मी कुठे ?

तू जरी मानले आरश्या सारखे
नेहमी पाहण्या सारखा मी कुठे  ?

हौस भागून घ्यावी कुणी आपली
लाकडी  खेऴण्या सारखा मी कुठे ?

तू  जशी मखमली मोग-या सारखी 
रेशमी चांदण्या सारखा मी कुठे ?

झाड माझे असे बाभळीचे गडे
अंगनी लावण्या  सारखा मी कुठे ? 

-शिलवंत सिरसाट   
मो:

तुझा दो घडीचा सहारा पुरेसा
ध्रुवा सारखा एक तारा पुरेसा

अपेक्षा न केली कधी बंगल्याची
मला झोपडीचा निवारा पुरेसा

कुपोषीत झाली पिले पाखरांची
जयाना मिलाला न चारा पुरेसा

जगाया नको मज दुआ मौलवींची
तुझा एक साधा इशारा पुरेसा

पिढ्या नष्ट झाल्या पशू-पाखरांच्या
हवा जंगलाना पहारा पुरेसा

 -शिलवंत सिरसाट

Wednesday, 2 October 2013


कर्म से उपर,ना कोई है … 


सच्चाई को धर्म ! झुटांई अधर्म !
पाप पुण्य कर्म ! दोनोसेही !

दिनरात पूजे ! राम चरित को !
साथ अधर्म को ! व्यर्थ हि हैं !!

साथ सच्चाई को ! प्रभू साथ रहे !
हा जीवन रहे ! खुशहाल !!

सून मेरे भाई ! प्रवीण सुनाई !
हैं सुनिसुनाई ! बात यह!

जैसा बोया वैसा ! आज तुने पाया !
नाही दुजा आया ! आजतक !!

बोवोगे करेला  ! ना आयेंग गन्ना !
 पोंओगे वहिना ! जो है बोया !!

सच्चाई से सच ! सकारात्मकता !
झुठ्से झुठता ! फरेबहि !!
     
धर्म या अधर्म ! आप पे निर्भर !
कर्म से उपर ! ना कोई है !!

कर्म सच्चाईसे ! सुकून पोंओगे !
या पछताओंगे ! अकर्मसे !!
 (अभंग )
-प्रवीण बाबूलाल हटकर .