मेरी क्रिसमस टू ऑल
भगवान 'येशु 'स अर्पण...
रुबाई प्रकार...
मी वेदनेचा देव आहेअन येशु माझे नाव आहे.
जस विरह वा संवेदनानी
हे बहरलेले गाव आहे.
-प्रवीण हटकर.
मन झाले प्राजक्त
स्पर्शुनी तुला,
घेना जरा साजणे
सुगंधुनी मला...!
-प्रवीण हटकर.
अशीच वाहत राहा
निरंतर तू माझ्यात,
बघतो रे वादळा
किती जोर तुझ्यात...!
-प्रवीण हटकर.
आठवणींना कधी आठवण येते का?
हा माझा तिला केलेला प्रश्न आहे,
ती ...थोडी स्तब्ध...मग हसली नि बोलली
कदाचित हेच माझे भाग्य आहे...!
-प्रवीण हटकर.
वेदनेच्या रानात
ती भेटली एकली,
उन असे तोवर होती
माझी लाडकी सावली...
-प्रवीण हटकर.
आज पुन्हा तुला
एक सांगावस वाटत,
दूर असली तरीही
आपलं म्हणावस वाटत...!
प्रवीण हटकर.
तू गुलाबी चांदणी
मी बघतोय तुला निरंतर,
नको होवूस ढगाआड
जीव माझा होतोय खालवर...!
-प्रवीण हटकर.