Monday, 15 April 2013


विचारांचे रोप, अंतरी लावून… 


विचारांचे चक्र! फिरुनी अंतरी!
घुटमळ तरी! मनात का!!

विचार उलटे!  विचार फुलटे!
विचार पलटे! ऐन वेळी!!

विचार ऐकुणी! विचार बोलती!
पाठपुरावा... ती! नाच करी!!

विचार करावा! सुयोग्य निर्मळ!
असावा प्रेमळ! भाव त्याचा!

विचारांचे  पार्श्व ! आकलन विश्व !
धावतोय अश्व ! सदाचारी !!

विचार सामर्थ्य! विचार कर्मार्थ!
व्हावे परमार्थ! विचारांत!!

विचार तू कर! विचार करुनी!
विचार मांडुनी! तू जगावे!!

विचारांचे रोप! अंतरी लावून!
वैश्विक होवून!  तू फुलावे!!
 
विचारी तू व्हावे! त्यावर जगावे!
व्यर्थ नाच द्यावे!  प्रवचन!!

प्रवीण विचार! आचार प्रचार!
व्हावा सदाचार! कृतीतुनी!!

- प्रवीण बाबूलाल हटकर 

अभंग... 
 
विठ्ठल हसला! 'मुक्त' आसमंता!
पाखरे उडता! स्वानंदली!!
  
विठ्ठल धावला! भक्ता संकटात!
केले दोन हात! रक्षणासी!!

विठ्ठल बोलला! सत्य तुझा धर्म!
सत्य तुझे कर्म! तू जपावे!!

विठ्ठल दिसला! मज मानवात!
सेवा दिनरात! अर्पियली!!

विठू तुझा हात! राहो आम्हा पाठी!
नि जगण्यासाठी! ध्यास तुझा!!

प्रवीण रे दंग! रचुनी अभंग!
तन मन रंग! आनंदिले !!

- प्रवीण बाबूलाल हटकर . 
एक आला आहे, दिवस उनाड… 


एक आला आहे! दिवस उनाड!
स्वताच लबाड! बनायचं!

मज्जाच करावी! हल्ला कल्ला करू!

पाखरास धरू! उडणाऱ्या!

खोड्या चल करू! आरोळ्या मारुया!

छेडूनी धावूया! वाटसरू!

रानात जावूया! झाडात शोधूया!

वाकोल्या दावूया! पूर्वजास!

पतंगी बसुया! गिरक्या मारुया!

गरुडा करूया! अचंबित!

सरता सरता! दिवस सरला!

अर्थ हा कळला! जीवनाचा!

आयुष्य जगूया! आयुष्या रंगुया!

आयुषी रमूया! स्वच्छंदीत!

प्रवीण सांगतो! आयुष्य सुंदर!

आयुष्य आदर! तुम्ही करा!

- प्रवीण बाबूलाल हटकर. 
मी देव मनाचा… 

मी देव मनाचा ! मनासी पुजतो !
मनासी भेटतो ! मनरूपी !!

मनशास्र काय ! जाणूनिया घे तू !
मनाने जप तू ! मन सारी !!

खेळता मनासी ! तो कोठे जिंकला !
लाखदा हरला ! तो बिचारा !!

मन काय आहे ! 
काय याची भाषा !
शोधे उगी दिशा ! चोहीकडे !!

प्रवीण सांगतो ! मन आहे आत्मा !
मन परमात्मा ! तल्लीन हो !!

-प्रवीण बाबूलाल हटकर 
पैसा पैसा ....

पैसा नाही मोठा! पैसा नाही छोटा!
पैशासाठी खोटा! बोले जो-तो!!

पैसा म्हणे बोले! पैसा म्हणे चाले!
पैशा संगे डोले! आज जो-तो!

पैसा झाली माय! पैसा झाला बाप!
गरोड्याचा साप! डोले जो-तो!!

पैसा माझा धर्म! पैसा माझे कर्म!
ओळखले मर्म! पैशामुळे!!

नाव गंगाराम! फिरे चारी धाम!
तुझ्यावीण काम! कोण करी!!

मी डाकू लुटेरा! हाती चाकू सुरा!
पैसा चोरणारा! तुम्हा प्यारा!

सत्ता माझ्या हाती! मोठी आहे छाती
पैशामुळे ख्याती! झुके जो-तो!!

मन नाही  मला! आत्मा नाही मला!
खर सांगू तुला! मी ईश्वर!!

जो पूजेल आज! डोक्यावर साज!
करील तो राज! मायारूपी!

प्रवीण का स्तब्ध! टाळतोय शब्द!
पैसाच प्रारब्ध! बोलूनिया!!

- प्रवीण बाबूलाल हटकर 


बारा जोतिर्लिंग दर्शन...
 
आद्य नमन हे ! भोले तुझ्या मुला!
श्री गणेशा तुला ! नमो नमा: !!

देवा सोमनाथा ! श्री केदारनाथा !
भोले वैद्यनाथा !  नमो नमा: !!

शिव नागेश्वरा ! महाकालेश्वरा !
शंभू घृष्णेश्वरा !  नमो नमा: !!

मल्लिकाअर्जुन! भोले रामेश्वरा !
श्री त्रंब्यकेश्वरा !  नमो नमा: !!

देवा भिमेश्वरा ! श्री ओम्कारेश्वरा !
दयाळू विश्वेश्वरा !  नमो नमा: !!

हे देवाधिदेवा ! भोले राजेश्वरा !
शंभू खोलेश्वरा ! नमो नमा: !!

बा... नीलकंठाय ! श्री मोरेश्वराय!
श्री भोलेनाथाय ! नमो नमा: !!

आक्राळ-विक्राळ ! रोद्र्य- अवतार!
नृत्य अविष्कार ! नटरंगी !!

गळी नागराज ! डमरू हातात !
गंगाही केशात ! विराजली !!

देवा वास तुझा ! कैलाश पर्वत !
नंदीही सेवेत ! दिनरात !!

देवी महादेवी ! पार्वती संगिनी !
तुझी अर्धांगिनी ! महादेवा !!

त्रिशूल सोडसी ! असुरा वधाया !
जगां उद्धराया ! भोलेनाथा !!

ऑं  नम: शिवाय ! मंत्रास जपूया!
तल्लीन होवुया ! शिव नाम !!

हाक देता देवा ! धाव घेतो देवा !  
भक्तासाठी देवा ! सदोदित !!

देवा तुज हवा! भक्तीमध्ये भाव!
निर्मल स्वभाव! भक्तामध्ये !!

श्रावण महिना ! महाशिवरात्र!
पूजतात भक्त ! तुज देवा !!

प्रवीण दंगतो ! प्रभू तुझ्या नाम !
तूच चारीधाम ! तुज नमो !!

-प्रवीण बाबुलाल हटकर 

माणूस...

माणसा ओळख ! माणसा पाळख !
माणूस ओळख ! माणसात !!

माणसाचा धर्म ! माणसाचे कर्म !
माणसाचे मर्म ! ओळखावे !!

जातपात धर्म ! हे नाहीच श्रेष्ठ !
ऐक सर्वश्रेष्ठ ! बा... माणूस !!

जात पात धर्म ! मानव निर्मित !
स्व: स्वार्थ सेवेत ! बा... नेमिले !!

कोण भगवंत ! कुणास बोलतो !
विद्वान जन्मतो! श्रेष्ठ जाती !!

धर्म नावाखाली ! कोणी तलवार !
कुणी काढे सुरा ! कशासाठी !!

माणूस कापतो ! माणसे सर्हास !
अघोरी विश्वास ! धर्म नावे !!

ही अमकी जात ! ती टमकी जात !
ती ढमकी जात ! आरोप का...? !!

धर्म नावाखाली ! घालूनी बुरखा !!
माणूस पारखा ! माणसाला !!

पहा वारकरी ! संप्रदाय एक !
माणूस हा एक ! दाखविला !!

माणूस हा श्रेष्ठ ! तै स्व: कर्तुत्वाने !!
कुठल्या धर्माने ! नाच होई !!

खरा एक धर्म ! माणूस ओळख !
मानवा ओळख ! स्व: अंतरी !!

-प्रवीण बाबूलाल हटकर