Wednesday, 24 April 2013

 गा… क्रांती आणि उत्क्रांती…



              -अभंग-



गा… क्रांती आणि उत्क्रांती ! फरकास समजूया !
ज्ञानासी भर घालूया ! बा… सुयोग्य !!

क्रांतीमध्ये जसा होतो ! बा… शीग्रतेने बदल !
परीस्तिथीत बदल ! घडतोया !!

ब्रिटीशी हुकुमशाही ! कायापालट करून !
लोकशाही रुजवून ! क्रांती केली !!

बा… हरितक्रांती पहा ! पारंपारिक सोडून !
अत्याधुनिक आणून ! शेती केली !!

आधुनिक तंत्रज्ञान ! बा अत्याधुनिक क्रांती !
आज विश्वरूपी क्रांती ! जाणलीया !!

बा उत्क्रांतीत बदल ! टप्प्या-टप्याने होतोया !
नी सातत्याने होतोया ! हळूहळू !!

मानवाच्या उत्क्रांतीत ! टप्या-टप्प्याने बदल !
बा… सातत्याने बदल !! घडलाय !!

राहणीमान बदल ! बोलण्या वागण्यात !
खाण्यात, बुद्धिमत्तेत ! बदलला !!

रानटी अवस्तेतून ! बा… आधुनिक स्वीकार !
हा उत्क्रांतीचा प्रकार ! युगातून  !!

क्रांतीचा बदल आहे ! तत्काळ नि शिग्रपणे !
बा… उत्क्रांती सातत्याने ! हळू-हळू !!

-प्रवीण बाबूलाल हटकर .

Friday, 19 April 2013


श्री. राम नवमीच्या समस्त भक्त गणास प्रेमळ भक्तिमय  शुभेच्छा …

अभंग …

हे राम श्री राम ! जय जय राम !
मुखी तुझे नाम ! सदोदित !!

दशरथ पुत्र ! अयोध्या नरेश !
तुझ्या ठाई शिश ! राम नाम !!

भक्त हनुमान ! हृदयात वास !
गा… हरेक श्वास ! तुझे नाम !!

लोकराजा आम्हा ! पुरषोत्तम राम !
देवा चारीधाम ! तुझं नमो !!

सितामाता तुझी ! जीवन संगिनी !
जीव-संजीवनी ! तुझं  नमो !!

स्वयंवर वेळी ! धनुष्य तोडीला !
जनक पुत्रीला ! वैवाहिले !!

तोडूनी धनुष्य ! अहम तुटला !
अनुभव आला ! परशुरामा !!

सन्मान देऊन ! पिता आदेशास !
केला वनवास  ! चौदा वर्ष !!

भरतास दिले ! राज्य कारभार !
शत्रुघ्न आधार ! मदतीला !!

वनवास केला ! लक्षमणा संगे !
सीतामाता संगे ! वणवण !!

श्री राम भक्तिनी ! शबरी भेटुनी !
दर्शन देऊनी ! धन्य केले !!

उष्ट बोर खात ! देऊनिया मोक्ष !
माता सीता साक्ष ! दिव्यक्षणी !! 

श्रुर्पनखा आली ! भेस बदलूनी !
रामास मोहिनी ! घालावया !!

लक्ष्मनाणे केले ! प्रहार नाकास !
परतुनी खास ! पाठविले !!

रावणाने सारे ! ऐकुनी कहाणी !
 पुष्पक विमानी ! धाव केली !!

कट रचुनिया ! माता पळविले !
वाटिकेत केले ! बंदिवान !!

सूड घेण्यासाठी ! राम नी लक्ष्मण !
संगे हनुमान ! लंका आले !!

बाली पुत्र संगे ! अंगद मदती !
विभीषण अंती ! मदतीस !!

रावण गर्वास ! हरण करून !
यायचे करून ! कट केला !!

मारोती उड्डाण ! वाटीकेस गेले !
जाळूनिया केले ! अर्धे भस्म !!

युद्धाची हि अता ! सुरवात आहे !
भयभीत पाहे ! रावण हो !!

महाकाय काल ! कुंभकर्णा यास !
यमसदनास ! पाठविले !!

बा…  लंका नरेश ! पुत्र महावीर !
अक्षयकुमार ! युद्धास हो !!

लक्ष्मण-अक्षय ! युद्धास प्रारंभ !
बाण अंदाधुंद ! वर्षाविले !!

अक्षय अखेरी ! युद्धात मारला !
दुख रावणाला ! फार झाले !!

पती वियोगात ! अक्षयची पत्नी !
बा… यमसदनी ! तीही गेली !!

अखेरी रावण ! महाकाय दैत्य !
दहामुखी दैत्य ! रणांगणी !!

घेत महाकाय ! अवतार पहा !
सूर्यास झाकला ! रावणाने !!

महा शक्तिशाली ! बुद्धिवंत दैत्य !
रावण हा सुप्त ! गुणी होता !!

श्रीरामचंद्राने ! बाणास सोडीले !
मुखास हो केले ! क्षतिग्रस्त !!

पुन्हा मुख जुडे ! आच्चारीले सारे !
विभीषण बरे ! सांगितले !!

नाभीमध्ये आहे ! जीवनअमृत !
मारताच मृत ! होयील हो !!

मारुनिया बाण ! रावणाचा वध  !
करुनी सावध ! दैत्यास हो !!

वनवास पूर्ण ! करुनिया आले !
दशरथ केले ! सन्मान हो !!

बा… अग्नी  परीक्षा ! सितामाता देत !
जनतेस देत ! विश्वास हो !!

हे राम श्री राम ! जय सीताराम !
जय जय राम ! नमो नम: !!

प्रवीण धन्यतो ! श्री राम चरिता !
अभंग करिता ! सादर हो !!

-प्रवीण बाबूलाल हटकर.
अकोला
मो : ८० ५५ २१३ २८१ 

Thursday, 18 April 2013

ज्ञय नी अज्ञय…

ज्ञय नी अज्ञय ! अर्थ हा जाणुया !
सहज होऊया ! ज्ञानदीप !!

बा… ज्ञय म्हणजे ! जाणीव तयाची !
समज जयाची ! जाणलेली !!

गा… ज्ञय माहिती  ! संपूर्णता आहे !
नी … ठळक आहे ! स्पष्टरूप !!

जे… जाणले आहे ! किती ? न माहिती !
अज्ञयाची व्याप्ती ! अखंडित !!

समुद्र हा ज्ञय ! तै पाणी अज्ञय !
हवाही अज्ञय ! दिसण्यास !!

अज्ञय ब्रम्हांड ! अज्ञय आकाश !
हा सूर्य प्रकाश ! बा… अज्ञय !!

अज्ञय जाणतो ! किती न माहिती !
बा ज्ञय माहिती ! किती आहे !!

विठू आम्हा ज्ञय ! परिचित आहे !
तया 'वास' आहे ! बा… अज्ञय !!

-प्रवीण बाबूलाल हटकर 

Monday, 15 April 2013

                                                                                                                           तारीख :

प्रती ,

मा. प्रकाशक साहेब,
लोकसंस्कृती प्रकाशन,
नारायणगाव.
                                     यांना सस्नेह पूर्वक नमस्कार
महोदय,
               पुस्तक प्रकाशन संदर्भात आपल्याशी फोनवर बोलणे झाले होते. त्यानुसार आपणाकडे माझा अभंग संग्रह पाठवीत आहे. ग्रामीण भागाशी निगडीत असलेल्या योजनांद्वारे  माझ्या अभंग संग्रहाचा पुस्तक प्रकाशनाकरिता विचार करावा . अशी विनंती करतो
               कृपया संग्रहाची नोंद असावी.  सहकार्य अपेक्षित.
                                                                                                                 
                                                                                                                         आपला विश्वासू



पूर्ण नाव : प्रवीण उर्फ डेबुजी बाबूलाल हटकर
पत्ता        : बी अन्ड सी क्वार्टर,
                मु. पो. ता. बार्शीटाकळी       
                जिल्हा - अकोला
                पिन कोड : ४४४४०१
मो         : ८० ५५ २१३ २८१          



माणूस कसला … 

किती येथे आले
निघुनिया गेले !
माणूस जाणले
नाम रुपी !!

मी मोठा नाही
मी नाही विद्वान !
नाहीच अजान
मतीमंद !!

नीती काय बोले
ऐका बांधवानो !
माझ्या आपल्यानो
लाडक्यानो !!

माणूस कसला
मुके माणुसकी !
जपे माणुसकी
तोची खरा !!

वेळ आली पहा
आत्मिक ज्ञानाची !
कळी जीवनाची  
बा फुलाया !!
- प्रवीण बाबूलाल हटकर .                  

हसऱ्या क्षणास… 

हसऱ्या क्षणास! लाख तू जगाला!
हसता हसला! जगताना!!

जगता जगता! क्षितीज गाठले!
स्वानंद जगले! मनी-तुझ्या!!

तिन्ही लोकी झाले! नाम तुझे असे!
ब्रम्हांड्च जसे! कान झाले!!

तू... हसत आहे! अजूनही तसा!
कल्पतरू जसा! मिळालेला!!

काल भेटायला! वादळ वणवा!
घेवूनी फतवा! आले होते!

नि... म्हणाले तुला! साडे साती आहे!
दुख आता आहे! भाळी तुझ्या !!

तू पण भोळाच! रीतीने बोलला!
दुध ना चहाला! काळा ठेऊ!!  

ते चिडलेत नि! वादळले  सुद्धा!
तू... रे...भाऊ दादा! बोलला त्या!!

ते पुन्हा म्हणाले! त्रास देण्या आलो!
मूर्ख नाही झालो! कळते का!!

तू स्मित हसला! नि त्यासी बोलला!
बोलता वागला! नम्रतेने!

हे सद गृहसता! आठ-चार दिस!
राहा.. गरिबास...! तोची मान!!

असे म्हणताच! वादळ वणवा!
फाडूनी फतवा! हसलेत!!

नि बोललेत त्या! आहेस तू कोण!
 भीतीची न जाण! का? तुजला!!

भीती काय आहे! मज ना माहित!
दुख ना माहित! हे महंत!!

घाबरू नकोस! मी पाठीशी आहे!
तुझ्या... बोल आहे! गुरुचे हे!!

मग का घाबरू! मागे दत्त गुरु!
का उगा घाबरू! सांगा तुम्ही!!

असे ऐकताच! वादळ वणवा!
शांत झाले.. बाबा! नाम घेता!!

लाख दुख आले! संकटे हि आले!
उलटे पळाले! नाम घेता!

श्री स्वामी समर्थ! नाम मी पूजित ! 
दर्शन घडीत! कार्यातुनी!!

समर्था पुजूनी! सद्कार्य तू  कर!
नाही तुला डर! कुठलाही!!

स्वामी देई तुला! भर भरुनी घे!
कार्यास तुझ्या घे! उंच झेप!!

प्रवीण समर्थ! करुनी कार्यास!
पूजिले कर्मास! भक्ती भावे!

समर्थ समर्थ! पूजिले समर्था!
सत्यार्थ  कर्मार्था! जाणुनिया!!

वादळ वनवे! दुख नि संकटे!
नाम घेता पिटे! समर्थांचे !!

-प्रवीण बाबूलाल हटकर . 

विचारांचे रोप, अंतरी लावून… 


विचारांचे चक्र! फिरुनी अंतरी!
घुटमळ तरी! मनात का!!

विचार उलटे!  विचार फुलटे!
विचार पलटे! ऐन वेळी!!

विचार ऐकुणी! विचार बोलती!
पाठपुरावा... ती! नाच करी!!

विचार करावा! सुयोग्य निर्मळ!
असावा प्रेमळ! भाव त्याचा!

विचारांचे  पार्श्व ! आकलन विश्व !
धावतोय अश्व ! सदाचारी !!

विचार सामर्थ्य! विचार कर्मार्थ!
व्हावे परमार्थ! विचारांत!!

विचार तू कर! विचार करुनी!
विचार मांडुनी! तू जगावे!!

विचारांचे रोप! अंतरी लावून!
वैश्विक होवून!  तू फुलावे!!
 
विचारी तू व्हावे! त्यावर जगावे!
व्यर्थ नाच द्यावे!  प्रवचन!!

प्रवीण विचार! आचार प्रचार!
व्हावा सदाचार! कृतीतुनी!!

- प्रवीण बाबूलाल हटकर