Tuesday, 25 November 2014

         गझल

श्वासास जागुनी भेट तू …
म्रुत्यूस चुकवुनी भेट तू …

एकांत जर हवा सोबती
हृदयात येउनी भेट तू …

भेटायचे तुला जर मला
देहास टाळुनी भेट तू …

तीर्ढी प्रवीणची सजवली
चल सरण होऊनी भेट तू …

जाणायचा तुला विरह जर
पानगळ होऊनी भेट तू …

माणूस शोधण्या ह्या युगी 
मुखवटे काढुनी  भेट तू … …

- प्रवीण बाबूलाल हटकर . 

Wednesday, 19 November 2014

मथल्यासह शेर ….
-  u  -  -  -  -  -

आठवांची रड आहे
काळजां धडधड आहे …

मुक्त व्हावे तू जीवा
श्वास तर जोखड आहे …

-प्रवीण बाबूलाल हटकर

Tuesday, 18 November 2014


मोगऱ्याची पाकळी तू
गुंततो मी ,  साखळी तू …

शोधतो मी अंबरी  अन
सागराच्याही तळी तू … 


२शेर … 

एक होण्या या समाजा
माणसांना जोडले मी … 

स्वच्छ निर्मळ मुक्त जगण्या 
बंध सारे तोडले मी … 

- प्रवीण बाबूलाल हटकर



Monday, 17 November 2014

एक शेर …

जन्म दाती लेकराचा जीव घेते
मग म्हणावे हीच आई की कसाई …

-प्रवीण बाबूलाल हटकर


एक शेर …

जन्म दाते जीव घेती लेकराचा
कलयुगाचे भेटले आम्हा कसाई ….

-प्रवीण बाबूलाल हटकर 

Saturday, 15 November 2014

गझल …

साजनीने सजावे किती ?
ह्या मनाने जळावे किती ?

पाखरानो अता झेप घ्या …
अंबराने झुकावे किती ?

शेकडो यातना अंतरी …
चेहऱ्याने हसावे किती ?

जीवना जाणतो मी खरे …
नशवराने पळावे किती ?

दोस्तहो ! सरण ही बोलले …
ह्या चितेने जळावे किती ?

माणसां एक तू व्हावया
कायद्याने झटावे किती ?

-प्रवीण बाबूलाल हटकर