PRAVIN HATKAR
माझ्या या प्रेमाचा चाखून बघ गुलकंद क्षणात मिळेल तुजला सात जन्माचा स्वानंद
Wednesday, 3 December 2014
तू अता हसत जा …
जीवना जगत जा …
पांडुरंग नामे
अंतरी भजत जा …
ज्ञान ही कस्तुरी
मुक्त दरवळत जा …
- प्रवीण बाबूलाल हटकर
ध्येय तर भेटती
त्या कडे पळत जा …
Monday, 1 December 2014
गझल
… विठ्ठला …
आमचा आधार विठ्ठला
तूच पालनहार विठ्ठला
संकटी भक्तास तारतो
तूच तारणहार विठ्ठला
रे तुझ्या नामात जाणतो
जीवनाचा सार विठ्ठला
ठेवतो ह्रदयात तर कुणी
मांडतो बाजार विठ्ठला
भाबळ्या भक्तीत दंगतो
दर्शुनी साकार विठ्ठला …
- प्रवीण बाबूलाल हटकर
Tuesday, 25 November 2014
गझल
श्वासास जागुनी भेट तू …
म्रुत्यूस चुकवुनी भेट तू …
एकांत जर हवा सोबती
हृदयात येउनी भेट तू …
भेटायचे तुला जर मला
देहास टाळुनी भेट तू …
तीर्ढी प्रवीणची सजवली
चल सरण होऊनी भेट तू …
जाणायचा तुला विरह जर
पानगळ होऊनी भेट तू …
माणूस शोधण्या ह्या युगी
मुखवटे काढुनी भेट तू … …
- प्रवीण बाबूलाल हटकर .
Wednesday, 19 November 2014
मथल्यासह शेर ….
- u - - - - -
आठवांची रड आहे
काळजां धडधड आहे …
मुक्त व्हावे तू जीवा
श्वास तर जोखड आहे …
-प्रवीण बाबूलाल हटकर
Tuesday, 18 November 2014
मोगऱ्याची पाकळी तू
गुंततो मी , साखळी तू …
शोधतो मी अंबरी अन
सागराच्याही तळी तू …
२शेर …
एक होण्या या समाजा
माणसांना जोडले मी …
स्वच्छ निर्मळ मुक्त जगण्या
बंध सारे तोडले मी …
- प्रवीण बाबूलाल हटकर
Monday, 17 November 2014
एक शेर …
जन्म दाती लेकराचा जीव घेते
मग म्हणावे हीच आई की कसाई …
-प्रवीण बाबूलाल हटकर
Newer Posts
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)