Wednesday, 27 February 2013

मान-अपमान

मान अपमान ! थोडस जानुया !
संपूर्ण जागुया ! योग्य काय? !!

मनाने मनाचा ! केलेला आदर !
सर्वांग साभार ! मान तोचि !!

मनी अनादर ! आहे अपमान !
नको अभिमान ! खोटा-नाटा  !!

मुखी  वाह वाह ! मनातून  द्वेष !
मान नाही क्लेश ! ऐक राजा !!

स्वार्थ सुखासाठी ! पुढे करतील !
दुषणे देतील ! पाठीमागे !!

मान तुम्हा मिळे ! मान तुम्ही देता !
काच ? तुम्ही देता ! अपमान !!

मान-अपमान ! जाणणे हे सोपे !
आचरणी जपे ! सदाचार !!

प्रवीण तो झाला ! सत्य हे जाणून !
मान-अपमान ! कार्यातून !!
-प्रवीण बाबूलाल हटकर .

समज समजण्या ! समज उमजण्या !
वणवण फिरण्या ! सज्ज झालो !!

समज जागृतीस ! बुद्धीवंत शोधले !
होम हवने हि केले ! न चुकता !!

पुस्तके चाळलित ! बारुदी विचारांची !
श्री. संत विचारांची ! राजरोस !!



 



Thursday, 14 February 2013


"साई गजानन समर्थ"


   विना तीन गुरु
कसा मिळेल परमार्थ
  एक मुखाने बोला
"साई गजानन समर्थ" !!

  'साई' तुझे बोल
सबका मालिक एक
  एक आहे ईश्वर
"माणूस" तुही एक !!

'गजानन' तुझी वाणी
गण गण गणात बोते
"मानवता हाच धर्म"
रुजविले मनी खाते !!

    'समर्थ' तुझी बोली
"घाबरू नकोस...आहे तुझ्या पाठी"
  सत्यार्थ...  जया अंगी गुण
 तै 'भक्त' रक्षणासाठी !!

-प्रवीण बाबूलाल हटकर .
मो: ८०५५२१३२८१
अकोला .

Tuesday, 12 February 2013

एक चरण ...


ना  कुणीही दाता !
ना कुणी विधाता !
हो ! माझा निर्माता !
"मी " फिनिक्स !!


-प्रविण बा . हटकर .