"साई गजानन समर्थ"
विना तीन गुरु
कसा मिळेल परमार्थ
एक मुखाने बोला
"साई गजानन समर्थ" !!
'साई' तुझे बोल
सबका मालिक एक
एक आहे ईश्वर
"माणूस" तुही एक !!
'गजानन' तुझी वाणी
गण गण गणात बोते
"मानवता हाच धर्म"
रुजविले मनी खाते !!
'समर्थ' तुझी बोली
"घाबरू नकोस...आहे तुझ्या पाठी"
सत्यार्थ... जया अंगी गुण
तै 'भक्त' रक्षणासाठी !!
-प्रवीण बाबूलाल हटकर .
मो: ८०५५२१३२८१
अकोला .
No comments:
Post a Comment