!! गण गण गणात बोते !!
** श्री. गजानन जय गजानन **
बाबा तुझी लीला! रे अपरंपार!
एकतेचा सार! दिला भक्ता!
बसलेत बाबा! एका झाडा खाली!
ज्ञान दीपावली! देत भक्ता!
त्याच झाडावर! होता आगे मोह!
डसण्याचा मोह! झाला कसा!
चिडलेला मोह! उतरला खाली!
तारांबळ झाली! भक्तांमध्ये!
सर्वच पळाले! एकटेच बाबा!
बसे अंगी धाबा! रे मोहाचा!
हे सगळे दृश्य! 'पाहून बंकट'!
बाबांना संकट! त्यास दिसे!
महाराजांना रे! टोचे माश्या काटे!
लाल मनी तुटे! बाबांसाठी!
बाबांचे संकट! बंकटास कळे!
मदतीस पळे! भक्त खरा!
बंकटलालचे! ओळखले मन!
खरे भक्त धन! कळे बाबा!
बाबांचा आदेश! जा आपल्या जागी!
मोहास रे आगी! लालसाठी!
त्याला चावू नका! भक्त आहे मोठा!
नाही कुणी खोटा! म्हणे बाबा!
आगे मोह उठे! नि झाडा परते!
बंकट पुरते! भारावले!
बाबांची हि लीला! कळे बंकटास!
भक्त झाले खास! आजीवणी!
संकटाच्या वेळी! होई परागंदा!
खोटा आहे धंदा मानवाचा!
शेगावीचा राणा! सांगतोय मंत्र!
मदतीचे तंत्र! स्वानंदाचे!
अभंग रचना....
-प्रवीण (डेबुजी) हटकर.
अकोला.
No comments:
Post a Comment