Thursday, 31 January 2013

(गझल) कता ...

एक जीवनाला घाव किती ? घाव किती ?
मोज काळजाला घाव किती ? घाव किती  ?

भेग अंबरच्या उदराला... प्रसुतीची,
झेल पावसाला घाव किती ? घाव किती ?........

प्रवीण बाबुलाल  हटकर.


Tuesday, 22 January 2013

          श्री गजानन                  श्री गणेशाय नम:                    माता कुल स्वामिनी प्रसन्न

                                                             शुभ विवाह 
                                             

               चि. प्रवीण उर्फ डेबुजी संगे  चि. सौ. कां. कल्पना उर्फ मोहिनी 

            श्री माता कुलदेवीच्या कृपेने माझा विवाह सोहळा ५ फेब्रु. २०१३ रोजी संपन्न होणार आहे.

आपणा सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे. या मंगल समयी, आपणा सर्वांचे शुभ आशीर्वाद -

आम्हा नव दांपत्यास लाभो हीच इच्छा ... पत्रिकेत स्थळ नमूद केलेले आहे.

                                        -प्रवीण बाबूलाल हटकर.

Monday, 21 January 2013

गझल...

दोन शेर ...

प्रेम म्हणजे भक्ती मनातून मनाची 
जागलेली शक्ती मनातून मनाची 

तूच माझी अन मी तुझा हुंकार मनी 
'धुंद की आसक्ती' मनातून मनाची 

-प्रवीण बाबूलाल हटकर.
मो. ८०५५२१३२८१

Tuesday, 8 January 2013

गझल...

माणसे वागली माणसा सारखी
स्वप्न मी पाहतो मृगजळा सारखी

प्रेमरूपी जसा, टाकते फास तू
डाव मग साधते पारध्या सारखी

आज ती माणसे दूर गेली पुन्हा
काल जी वागली, आपल्या सारखी

मी दिले मुक्त आकाश संचारन्या
झेप घे... तू अता पाखरा सारखी

मखमली पावले घेवुनी येत तू ...
स्वप्न वाटे खरे जाहल्या सारखी

दुख अन वेदना हे असे सोबती
साथ देती मला जिवलगा सारखी

आरसे का असे वागती सांग ना?
मुखवटे दावती चेहऱ्या सारखी

हे तुझे प्रेम की, का? तुझे वेड  हे...
पाहते तू मला आरशा सारखी

चाळता पुस्तके जीवनाची अता ...
जिंदगी वाटली संपल्या सारखी .

-प्रवीण बाबूलाल हटकर.
मो. ८०५५२१३२८१
अकोला.