Tuesday, 8 January 2013

गझल...

माणसे वागली माणसा सारखी
स्वप्न मी पाहतो मृगजळा सारखी

प्रेमरूपी जसा, टाकते फास तू
डाव मग साधते पारध्या सारखी

आज ती माणसे दूर गेली पुन्हा
काल जी वागली, आपल्या सारखी

मी दिले मुक्त आकाश संचारन्या
झेप घे... तू अता पाखरा सारखी

मखमली पावले घेवुनी येत तू ...
स्वप्न वाटे खरे जाहल्या सारखी

दुख अन वेदना हे असे सोबती
साथ देती मला जिवलगा सारखी

आरसे का असे वागती सांग ना?
मुखवटे दावती चेहऱ्या सारखी

हे तुझे प्रेम की, का? तुझे वेड  हे...
पाहते तू मला आरशा सारखी

चाळता पुस्तके जीवनाची अता ...
जिंदगी वाटली संपल्या सारखी .

-प्रवीण बाबूलाल हटकर.
मो. ८०५५२१३२८१
अकोला.

No comments:

Post a Comment