विश्वास ना येई, वारसा हक्काने …
त्यासी म्हनावेत !
स्व:विश्वास ज्ञात
ज्यासी नसे !!
स्व: विश्वास असे
जया अंतरंगी !
तो निडर जगी
गा… वावरे !!
विश्वास फुलतो
सहजच अंगी !
स्पष्ट ज्याचे जगी
गा… विचार !!
विश्वास ना येई
वारसा हक्काने !
येतो हिमतीने
स्व: अंतरी !!
विश्वासी समर्थ
लाभे कार्य अर्थ
ना लाभे कार्यार्थ
अविश्वासी !!
(अभंग … )
-प्रवीण बाबूलाल हटकर