Saturday, 12 October 2013

गजल

ऐकण्या-वाचण्या सारखा मी कुठे ?
संग्रही ठेवण्या सारखा मी कुठे ?

तू जरी मानले आरश्या सारखे
नेहमी पाहण्या सारखा मी कुठे  ?

हौस भागून घ्यावी कुणी आपली
लाकडी  खेऴण्या सारखा मी कुठे ?

तू  जशी मखमली मोग-या सारखी 
रेशमी चांदण्या सारखा मी कुठे ?

झाड माझे असे बाभळीचे गडे
अंगनी लावण्या  सारखा मी कुठे ? 

-शिलवंत सिरसाट   
मो:

तुझा दो घडीचा सहारा पुरेसा
ध्रुवा सारखा एक तारा पुरेसा

अपेक्षा न केली कधी बंगल्याची
मला झोपडीचा निवारा पुरेसा

कुपोषीत झाली पिले पाखरांची
जयाना मिलाला न चारा पुरेसा

जगाया नको मज दुआ मौलवींची
तुझा एक साधा इशारा पुरेसा

पिढ्या नष्ट झाल्या पशू-पाखरांच्या
हवा जंगलाना पहारा पुरेसा

 -शिलवंत सिरसाट

No comments:

Post a Comment