Sunday, 27 April 2014

         गझल

का ….


का… ? असे हे घडावे
मी न माझ्यां उरावे …

पोर्णिमा तू गुलाबी
चंद्रमा मी असावे …

आरसा बोलला मज
आतले ना दिसावे …

तोडले काळजाला
घेतले ना पुरावे …

वादळे शांत सरना …
आत तू का ? जळावे ….

काळजातील जखमा
ना जगाला कळावे

कागदाची नाव ती …
बा… किती हो ! पळावे …

भेटती माणसे मज
फक्त  'मी' 'मी' नसावे …

भेटलो मी मला का ?
प्रश्न हे का ? पडावे …

आसवे आज डोळी  …
हुंदके का ? हसावे ….

- प्रवीण बाबूलाल हटकर 

Thursday, 17 April 2014

          गझल

जिंदगी, मोसमी आहे
एक तू … एक मी आहे … 

एव्हडे,  एकरूप अता 
प्राण तू … श्वास मी आहे … 

जिंकता बोलला कासव
तू उद्या आज मी आहे

जीवना ही तुझी खेळी
लाथ तू बॉल मी आहे

बोलतो  जन्म मृत्यू ला
अंत तू उगम मी आहे …

- प्रवीण बाबूलाल हटकर

Monday, 7 April 2014

           गझल
 (एक मथळा दोन शेर )


जीवनाची सांगतोया मी कहाणी
चेहऱ्यावरती हसू डोळ्यात पाणी …

गा… उन्हाचा वाढतोया जोर जेव्हा
पारव्याची ऐकतो मी विरह गाणी …

संकटाना घाबरावे काच आम्ही
वादळांना पेलण्या गेली जवानी …

-प्रवीण  बाबूलाल हटकर


Saturday, 5 April 2014

कार्य , कीर्ती तुझी , वृत्तीत  निर्भर …


वृत्ती तुझी जशी ! जगा ज्ञात तसा !
वेगळाची ठसा ! ना … उमटे !!

स्वार्थ समाधानी ! क्रूर अभिमानी !
धूर्त स्वाभिमानी ! वा कपटी !!

ओळख तुझिया ! वृत्ती दाखवेल !
जग हि ओळखेल ! त्या - परिस !!

पामर होयील ! लाख धनवान !
ना… परिवर्तन ! वृत्तीत हो !!

भिकार्यास दान ! लाख तू करावे !
भिकेसाठी यावे ! पुन्हा त्याने !!

वृत्ती त्याची आहे ! भिक मागण्याची !
आहे जगण्याची ! कष्टाविना !!

कर्णाचीया वृत्ती ! दानशूर आहे !
संतांचिया आहे ! समाधानी !!

गाढवास करा ! स्वच्छ अंघोळीत !
जायील घाणीत ! लोळण्यासी !!

माकडाची वृत्ती ! आहे लालसेची !
जीवा बेतण्याची ! तमा न त्या !!

बगडा हा धर्त ! लांडगा चतुर !
दुश्मन फितूर ! वृत्ती आहे !!

संवेदन ऐशू ! बुद्ध शांतीसाठी !
कृष्ण प्रेमासाठी ! जानलेया !!

बा… चाणक्य नीती ! पोपटाची वाणी !
कोकिळेची गाणी ! ज्ञात सर्वा … !!

आहे बेईमान ! ज्ञात बेईमान !
इमानदार न ! दिसे जगी !!

कार्य , कीर्ती तुझी ! वृत्तीत  निर्भर !
दिसेल साभार ! वागतांना !!

(अभंग … )
- प्रवीण बाबूलाल हटकर 

Thursday, 3 April 2014

गझल …

आयुष्या एकदा , तू हसून बघ …
ऐक वेड्या जरा , तू जगून बघ … 

मूर्ख तू बनवशी , आज सगळ्यास  
भरवसा एकदा , तू बनून बघ …   

संकटे वादळे , तर सभोवती
कंबरेला जरा , तू कसून बघ …

केव्हडी जिंदगी , झालीया स्वस्त
श्वास घे रोकून , तू मरून बघ …

हारण्याची मजा वाढते अशी …
जिंकता जिंकता , तू हरून बघ …

-प्रवीण बाबूलाल हटकर

Wednesday, 2 April 2014

 बा… तुझ्यात मुक्ती,आनंदाई … 


देवा पांडुरंग ! पांडुरंग हरी !
मनाच्या या द्वारी ! धाम तुझे !!

पांडुरंग माझ्या ! हरेका श्वाशात !
बा… रगारगात ! भिनलेला !!

ना कुठला स्वार्थ ! ना कुठला मोह !
एक स्वार्थ मोह ! नाम तुझ्या !!

देवा पांडुरंगा ! आलोया शरणा !
दे मज चरणा ! जागा तुझ्या !!

पांडुरंग भक्ती ! मिळे नाम शक्ती !
बा… तुझ्यात मुक्ती ! आनंदाई !!

पांडुरंग धागा ! मन आहे मनी !
ओउनिया गुणी ! एक होऊ !!

देवा ब्रम्हरूप ! आहे विश्वरूप !
अनंत स्वरूप ! पांडुरंग !!

(अभंग … ) 
-प्रवीण बाबूलाल हटकर .