कार्य , कीर्ती तुझी , वृत्तीत निर्भर …
वृत्ती तुझी जशी ! जगा ज्ञात तसा !
वेगळाची ठसा ! ना … उमटे !!
स्वार्थ समाधानी ! क्रूर अभिमानी !
धूर्त स्वाभिमानी ! वा कपटी !!
ओळख तुझिया ! वृत्ती दाखवेल !
जग हि ओळखेल ! त्या - परिस !!
पामर होयील ! लाख धनवान !
ना… परिवर्तन ! वृत्तीत हो !!
भिकार्यास दान ! लाख तू करावे !
भिकेसाठी यावे ! पुन्हा त्याने !!
वृत्ती त्याची आहे ! भिक मागण्याची !
आहे जगण्याची ! कष्टाविना !!
कर्णाचीया वृत्ती ! दानशूर आहे !
संतांचिया आहे ! समाधानी !!
गाढवास करा ! स्वच्छ अंघोळीत !
जायील घाणीत ! लोळण्यासी !!
माकडाची वृत्ती ! आहे लालसेची !
जीवा बेतण्याची ! तमा न त्या !!
बगडा हा धर्त ! लांडगा चतुर !
दुश्मन फितूर ! वृत्ती आहे !!
संवेदन ऐशू ! बुद्ध शांतीसाठी !
कृष्ण प्रेमासाठी ! जानलेया !!
बा… चाणक्य नीती ! पोपटाची वाणी !
कोकिळेची गाणी ! ज्ञात सर्वा … !!
आहे बेईमान ! ज्ञात बेईमान !
इमानदार न ! दिसे जगी !!
कार्य , कीर्ती तुझी ! वृत्तीत निर्भर !
दिसेल साभार ! वागतांना !!
(अभंग … )
- प्रवीण बाबूलाल हटकर
वृत्ती तुझी जशी ! जगा ज्ञात तसा !
वेगळाची ठसा ! ना … उमटे !!
स्वार्थ समाधानी ! क्रूर अभिमानी !
धूर्त स्वाभिमानी ! वा कपटी !!
ओळख तुझिया ! वृत्ती दाखवेल !
जग हि ओळखेल ! त्या - परिस !!
पामर होयील ! लाख धनवान !
ना… परिवर्तन ! वृत्तीत हो !!
भिकार्यास दान ! लाख तू करावे !
भिकेसाठी यावे ! पुन्हा त्याने !!
वृत्ती त्याची आहे ! भिक मागण्याची !
आहे जगण्याची ! कष्टाविना !!
कर्णाचीया वृत्ती ! दानशूर आहे !
संतांचिया आहे ! समाधानी !!
गाढवास करा ! स्वच्छ अंघोळीत !
जायील घाणीत ! लोळण्यासी !!
माकडाची वृत्ती ! आहे लालसेची !
जीवा बेतण्याची ! तमा न त्या !!
बगडा हा धर्त ! लांडगा चतुर !
दुश्मन फितूर ! वृत्ती आहे !!
संवेदन ऐशू ! बुद्ध शांतीसाठी !
कृष्ण प्रेमासाठी ! जानलेया !!
बा… चाणक्य नीती ! पोपटाची वाणी !
कोकिळेची गाणी ! ज्ञात सर्वा … !!
आहे बेईमान ! ज्ञात बेईमान !
इमानदार न ! दिसे जगी !!
कार्य , कीर्ती तुझी ! वृत्तीत निर्भर !
दिसेल साभार ! वागतांना !!
(अभंग … )
- प्रवीण बाबूलाल हटकर
No comments:
Post a Comment