Wednesday, 28 May 2014

कैसे आभाळा कुशीत ! निजलेया एक स्वप्न !
हंबरले कैक प्रश्न ! गोंजारता !!

आभाळ गर्भास येता !बा… विजाडलेली कळा  !
बहरे प्रकाश मळा ! आसमंती !

 भूमी नाचे मोरापरी ! येणार पावूस सरी !
आनंदाने गाऊ तरी ! नाच कळे !!

आभाळही वादळले ! दूर दूर पसरले !
पर्वतास आच्छादले ! घसरले !! 
  
बा… आभाळ उसवले ! अलगद अलगद !
होऊनिया गदगद ! वार्यासवे !!


Monday, 26 May 2014

धर्म कशासाठी ! धर्म कुणासाठी !
धर्म नावे काठी ! कुणाहाती !!

जो तो पछाडला ! बा… धर्म गुंत्यात !
बा… धर्म गोत्यात ! अडकला !!

अमक्या धर्मात ! टमक्या धर्मात !
धमक्या धर्मात ! निरर्थक !!

जाणला  का कुणी ! धर्माचा उद्देश !
धर्माचा संदेश ! उपदेश !!

धर्म व्याप्ती काय ! धर्म शक्ती काय !
धर्म युक्ती काय ! जाणलेया !! 


Saturday, 24 May 2014



भजे तसे, रूप दावी, गजानन … 

गजानन गजानन ! एक हाक अंतरीची !
ऐक हाक पामराची !गजानन !!

एक चित्त तुझे नाम ! नाम तुझ्या समाधान !
आम्हा वास्तवाची जान ! गजानन !!

लोखंडचे होई सोने ! किमया करी परिस !
भक्तां झालेया परिस ! गजानन !!

मल्हार कुणा विठ्ठल ! कुणी देखिले गोसावी !
भजे तसे, रूप दावी ! गजानन !!

चकोरा चंद्रकिरण  ! चातका आस पाण्याची !
आम्हा आस दर्शनाची ! गजानन !!

एक जन्म एक मृत्यू ! हे त्रिकाली सत्य आहे !
सोबतीला गुरु आहे ! गजानन !!

अभंग ….
-प्रवीण बाबूलाल हटकर 

Tuesday, 20 May 2014

एक एक श्वासा ! जपलेया माझ्या !
संजीवन माया ! माय माझी !!

ठेच जेव्हा लागे ! लागे ठेच पाया !
येई सावराया ! माय माझी!!

Tuesday, 13 May 2014

एक मतला एक शेर

अंतरीचा हुंकार माय माझी
जीवनाचा बा…  सार माय माझी

भाकरीच्या प्रश्नास मिटविताना
विसरलीया श्रुंगार माय माझी…

-प्रवीण बाबूलाल हटकर

Friday, 9 May 2014

ऐ कागज कि कष्टी …

ऐ  कागज की कष्टी,
तू जा इस घर से उस मकां तक
सडक के उस पार …
मेहबूब ई हमसफर के कदमोतले …
दिल ए पैगाम लेकर … हा रु ब रु हो …
एक गुफ्तचर  कि तरह …
अब ध्यान से सुनो
मेरी आवाज को कानोमे बुनो …
ठीक बीच सडक मे है भवर
जो तुम्हे ले जायेन्गा पिताजीके ओर मोडकर   …
या फेर सकता है मेरी ओर ,
हो सकता है  डुबा दे साथ तुम्हे लेकर …
मुझे डर नही आपका डूबके खुदखुशी करणे का ?
 फ़कत… है  डर इस बात का ?
उसपर लिखा है  एक  नाम
ठीक  मेरे नाम के आगे है उसका नाम …
एक नये रिश्ते कि शुरवात लिये  …
मेरे मंजिल ई हमसफर के लिये …

-प्रवीण बाबूलाल हटकर    

Tuesday, 6 May 2014

  गझल

वादळे वादळे वादळे
सोबती जोवरी तू गडे …


जीवना गायिले मी तुझे
हे धडे ते धडे ते धडे …


लावले आसवे सिंचणी
बहरले वेदनांचे मळे …


काळजां काळजां काळजां
तू किती? जाळशी आतळे …


एक तू  एक मी …  एक ना
अन उभे एकटे झोपडे …


घसरला पाय माझा जसा …
केव्हडी हासली माकडे …


-प्रवीण बाबूलाल हटकर