अभंग...
तुळजापुरची! हे भवानीमाता!
देवी आदी माता! तुझं नमो!!
जगत जननी! जगत कल्याणी!
प्राण- संजीवनी! तुझं नमो!!
शिवबा शरण! पाठीवर हात!
दुष्मनाना मात! मिळविली!!
महाराष्ट्रावर! तुझी कृपा दृष्टी!
जपलीया सृष्टी! मराठ्यांची!!
रे.. जय भवानी! रे... जय शिवाजी!
जय घोष जी... जी...! उठलाय!!
आशीर्वाद तुझा! मर्द मराठ्यांना!
आम्हास वीरांना! अभय दे!!
आशेचे किरण! प्रवीण बघतो!
मराठा जगतो! तुझ्या ठायी!!
-प्रवीण(डेबुजी) हटकर.
No comments:
Post a Comment