Tuesday, 25 September 2012

अभंग...

कोळसा ना झाला ! आजवर सोन !
ना झालेया सोन ! बा... कोळसा !!

गाढवा सजले ! अंघोळ करुनी !
लोळले जाऊनी ! घानेमध्ये !!

कावळा घासतो ! अंगास साबण !
चांबळ सोलुण ! मरतोया !!

पोपट बोलतो ! वाणीतून गोड !
कोकिळेसा गोड ! ना गायीला !!

गुणधर्म ज्याचे ! जो तो जोपासितो !
गुण ना दावितो ! वेगळेची !!

नको होऊस तू ! रे गोगल गाय !
पोटामध्ये पाय ! कायमचे !!

मानवा ओळख ! कार्य तुझे काय !
संदर्भ हा काय ! जीवनाचा !!

कापूर जळतो ! कापूर विरतो !
कापूर उरतो ! अंश त्याचा !!

गुणधर्म तुझे ! बा... इतरांपरी !
जोपासले जरी ! तू जिंकला !!

-प्रवीण (डेबुजी) हटकर.

Monday, 17 September 2012


...अभंग...



विठ्ठल माउली ! नामात गावली !
प्रेमळ सावली ! विसावितो !!


विठूराया उभा ! घेउनिया ढाबा !
भजताच ताबा ! मिळे भक्ता !!


विठ्ठल विठ्ठल ! पांडुरंग हरी !
भजुनी अंतरी ! सुखावितो !!


जयघोष नाम ! वारकरी दंग !
चढतोया रंग ! भक्ती रंगा !!


आलोया शरण ! भिजल्या अंतरी !
स्पंदन अंबरी ! मुरलेया !!


निर्मळ कोमल ! स्वच्छंदी स्वभाव !
भक्ता मध्ये भाव ! तुज हवा !!


-प्रवीण(डेबुजी) हटकर.

Thursday, 13 September 2012

              -अभंग-
   ***श्री स्वामी समर्थ***

समर्थ समर्थ ! श्री स्वामी समर्थ !
जाण  परमार्थ ! स्वामी ठाई !!

अदभूत माया ! वात्सल्याची काया !
भक्तासाठी छाया ! सदोदित !!

घाबरू नकोस ! मी पाठीशी तुझ्या !
मंत्र मुखी तुझ्या !! भक्तासाठी !!

सद्कार्य कर्म ! भाव सदाचारी !
ना मग लाचारी ! पत्करावी !!

समर्थ दाखवी ! सद्कर्म  मार्ग !
जीवन बा... स्वर्ग ! बहरेल !!

दत्त दत्त दत्त ! स्वामी स्वामी स्वामी !
जय जय स्वामी ! श्री समर्थ !!

श्री स्वामी समर्थ ! जपुनिया नाम !
मिले चारीधाम  ! स्वामी ठाई !!

-प्रवीण(डेबुजी) हटकर .  

Friday, 7 September 2012

                   अभंग ...
       *** कापुरासमान ***
तुच्छ तुच्छ तुच्छ ! कोण येथे तुच्छ !
कोण आहे स्वच्छ ! बा ... ओळख !!

जो तो लागलाय ! समर्थ बनाया !
दुसऱ्यास द्याया ! कमीपण !!

कुणी धर्म नावे ! कुणी जाती नावे !
कुणी प्रांत नावे ! हक्क दावी !!

याची छोटी जात ! माझी मोठी जात !
त्याची थिटी जात ! भ्रम का हा !!

तूझे उच्च कुळ ! त्याचे निच्च कुळ !
डोक्यातील खुड ! बा ... काढावे !!

कमळ उगतो ! चिखल जागेत !
परी नजरेत ! मोहतोया !!

पळस फुलतो ! भाग खडकात !
जणु शिकवीत ! जगण्याला !!

माणसा तू कसा ! भुलला कर्मास !
का तुझ्या मार्गास ! भूलतोय !!

धर्म हे अनेक  ! जाती ह्या अनेक !
उद्देश हा नेक ! बा ...तुझ्याशी !!

तुझिया ओळख ! तुझ्या गुण-दोषी !
जसा वागलासी ! तू जाणला !!

कीर्ती तुझी असो ! कापुरा समान !
जळूनी प्रमाण ! कापुराचे !!

-प्रवीण(डेबुजी) हटकर .

Saturday, 1 September 2012

एक जाणीव ...

तू आयुष्यात येता 
जणू हे घर विश्व बनलं 

नी तू दूर निघून जाता ...
हे विश्वची घर बनलं 

-प्रवीण(डेबुजी) हटकर.