Friday, 7 September 2012

                   अभंग ...
       *** कापुरासमान ***
तुच्छ तुच्छ तुच्छ ! कोण येथे तुच्छ !
कोण आहे स्वच्छ ! बा ... ओळख !!

जो तो लागलाय ! समर्थ बनाया !
दुसऱ्यास द्याया ! कमीपण !!

कुणी धर्म नावे ! कुणी जाती नावे !
कुणी प्रांत नावे ! हक्क दावी !!

याची छोटी जात ! माझी मोठी जात !
त्याची थिटी जात ! भ्रम का हा !!

तूझे उच्च कुळ ! त्याचे निच्च कुळ !
डोक्यातील खुड ! बा ... काढावे !!

कमळ उगतो ! चिखल जागेत !
परी नजरेत ! मोहतोया !!

पळस फुलतो ! भाग खडकात !
जणु शिकवीत ! जगण्याला !!

माणसा तू कसा ! भुलला कर्मास !
का तुझ्या मार्गास ! भूलतोय !!

धर्म हे अनेक  ! जाती ह्या अनेक !
उद्देश हा नेक ! बा ...तुझ्याशी !!

तुझिया ओळख ! तुझ्या गुण-दोषी !
जसा वागलासी ! तू जाणला !!

कीर्ती तुझी असो ! कापुरा समान !
जळूनी प्रमाण ! कापुराचे !!

-प्रवीण(डेबुजी) हटकर .

No comments:

Post a Comment