Tuesday, 25 September 2012

अभंग...

कोळसा ना झाला ! आजवर सोन !
ना झालेया सोन ! बा... कोळसा !!

गाढवा सजले ! अंघोळ करुनी !
लोळले जाऊनी ! घानेमध्ये !!

कावळा घासतो ! अंगास साबण !
चांबळ सोलुण ! मरतोया !!

पोपट बोलतो ! वाणीतून गोड !
कोकिळेसा गोड ! ना गायीला !!

गुणधर्म ज्याचे ! जो तो जोपासितो !
गुण ना दावितो ! वेगळेची !!

नको होऊस तू ! रे गोगल गाय !
पोटामध्ये पाय ! कायमचे !!

मानवा ओळख ! कार्य तुझे काय !
संदर्भ हा काय ! जीवनाचा !!

कापूर जळतो ! कापूर विरतो !
कापूर उरतो ! अंश त्याचा !!

गुणधर्म तुझे ! बा... इतरांपरी !
जोपासले जरी ! तू जिंकला !!

-प्रवीण (डेबुजी) हटकर.

No comments:

Post a Comment