Monday, 29 October 2012

अभंग...
श्री हरी विठ्ठल ...
श्री हरी विठ्ठल ! पांडुरंग हरी !
जय जय हरी ! पांडुरंगा !!

भक्त हाका देई ! मनातून राया !!
 वासराला माया ! गाय देई !!

विठ्ठल नामात ! रंगतो, दंगतो !
जागतो, जाणतो ! भक्तीभाव !!

विठू तू विश्वास ! विठू तूच श्वास !
तुझा सहवास ! स्वर्गसुख !!

विठू तू समक्ष ! भक्तांसाठी दक्ष !
चरणी या मोक्ष ! लाभो आम्हा !!

प्रवीण जाहलो ! अनुभूती येता  !
अहंकार जाता ! पांडुरंगा !!

-प्रवीण बा. हटकर
विठ्ठल-रुख्माई...
विठ्ठल माऊली! तुझ्या दर्शनाला ! 
चाले पंढरीला ! वारकरी !!
टाळ वाजवूनी! नाम जय घोष!
मनी नाही रोष! बा...विठ्ठला!!
ढोल, ताशे आणि ! वाजवी मृदुंग !
एकरूप दंग! भक्त झाले !!
विठ्ठल-रुख्माई ! बाबा आणि आई !
रूप विठ्ठलाई ! आम्हा दिसे !!
भक्तांसाठी उभा ! युगे अठ्ठावीस !
साल, रात्रंदिस ! अविरत !!
प्रवीण पुजतो! प्रवीण रंगतो!
प्रवीण दंगतो! विठू नाम !!
-प्रवीण(डेबुजी) हटकर.

                
                   अभंग...
बाबा तुझिया लिला ...

गजानन माऊली ! माऊली माऊली तू !
प्रेमळ सावली तू ! ममतेची !!
 
विना आग चिलीम ! पेटवून दाविसी !
दंगला कौतुकासी ! भक्त मेळां !!

तू ब्रम्हांड नायक ! तूची भाग्य विधाता !
तू माता-पिता, दाता ! तुज नमो !!

बाबा तुझिया लिला ! तू जागसी, जाणसी !
गण गण जोडसी ! एकतेने !!

अन्न हे पूर्ण-ब्रम्ह ! खाऊनी उष्टे अन्न !
सांगितलेया गण ! तै महत्त्व !!

-प्रवीण(डेबुजी) हटकर.

Thursday, 25 October 2012

अभंग...

!! श्री हरी विठ्ठल पांडुरंग हरी !!
 
श्री हरी विठ्ठल ! पांडुरंग हरी !
जय जय हरी ! पांडुरंगा !!

भक्त हाका देई ! अंतरीत असा !!
तरंगला ठसा ! स्पंदनात !!

विठ्ठल विठ्ठल ! रंगता दंगता !
जागता जाणता ! विठू नाम !!

विठू तू विश्वास ! विठू तूची श्वास !
तुझा सहवास ! स्वर्गापरी !!

विठू तू समक्ष ! भक्तासाठी दक्ष !
चरणी या मोक्ष ! मिळो आम्हा !!

प्रवीण जहालो ! अनुभूती येता  !
अहंकार जाता ! पांडुरंगा !!

-प्रवीण(डेबुजी) हटकर.
-

 

Tuesday, 23 October 2012

अभंग...
नाम तुझे घेता! आसमंत झाला!
सुखे वर्षावला!! गजानना!!
मी शूद्र तुझ्यात ! पाही विठूराया!
विठ्ठलासी काया! तू रुपिली !!
 
प्रेमळ माऊली! तुझ्यात गावली!
मायेची सावली! देई आम्हा!!
 
गजानन बाबा! तुझी अनुभूती!
शेगाव जाणती! स्वर्गापरी!!
 
प्रवीण जाणतो! शेगावी जो जातो!
स्वानंद हर्षितो! मनोमनी!!
          प्रवीण(डेबुजी) हटकर।  
          मो. ८०५५२१३२८१
                अकोला

Saturday, 20 October 2012

अभंग...
नाम तुझे घेता! आसमंत झाला!
सुखे वर्षावला!! गजानना!!

रूप दिसे मला! अनंत अनंता!
सामान्य महंता! चराचरी!!
मी शुद्र तुझ्या! पाही विठूराया!
विठलासी काया! तू रुपिली!!

मेंढ्यास हाकितो! मल्हार भानोसी!
बाबा चाललासी! एकतेला!!
गजानन बाबा! तुझी अनुभूती!
शेगाव जाणती! स्वर्गापरी!!

जगत महंता! घे मज शरणा!
दे मज चरणा! जागा तुझ्या!!
प्रेमळ मावुली! तुझ्यात गावली!
मायेची सावली! देई आम्हा!!

प्रवीण जाणतो! शेगावी जो जातो!
स्वानंद हर्षितो! मनोमनी!!
          प्रवीण(डेबुजी) हटकर।  
          मो. ८०५५२१३२८१
                अकोला

Friday, 19 October 2012

नवरात्रीच्या समस्त भक्त गणास प्रेमळ शुभेच्छा...

अभंग...

शेरावाली माता ! ज्योतावाली माता !
नवदुर्गा माता ! तुज नमो !

देवी शैलपुत्री ! महा कालरात्री !
आई सिद्धदात्री ! तुज नमो !!

हे ब्रह्मचारिणी ! देवी कांत्यायनी !
जीव संजीवनी ! तुज नमो !!

प्रेमळ कृष्मांडा ! देवी स्कंदमाता !
एकविरा माता ! तुज नमो !!

आई आई आई ! चंद्रघटा आई !
महागौरी आई ! तुज नमो !!

रूप दिसे मज ! सप्तश्रुंगी आई !
रुपियली आई ! काया तुझी !!

भक्त गण भजे ! दिनरात नाम !
तूची चारीधाम ! तुज नमो !!

प्रवीण जाणतो ! शरण जो जातो !
चरणी पाहतो ! स्वर्ग तुझ्या !!

- प्रवीण ( डेबुजी) हटकर

एक आगळावेगळा प्रयोग... हिंदी-उर्दू-मराठी गझल !

   "मारवा"
जिंदगी कारवा
बोलला पारवा

आह थंडी भरी
बोचला गारवा

बासुरी यह बजी
गायिला मारवा

छेद है रूह पर
भेग ती सारवा

डाल पाणी जरा
घट्ट झाला रवा !!!

                  - प्रवीण (डेबुजी) हटकर
                मोब: ८०५५३१२२८१

Friday, 12 October 2012

हक्कासाठी तुझ्या ! हक्काने बोलावे !
हक्काने लढावे ! हक्कासाठी !!

तडजोड नको ! तुझ्या हक्कासाठी !
दुजा हक्कासाठी ! ना तू ठेव !!

हक्क ओळखावे ! हक्कास जाणावे !
हक्कास जपावे ! आत्मरूप !!


Monday, 1 October 2012

              ...गुरु ...
गुरु कोण आहे ! कसे ओळखावे !
कसे पारखावे ! मह्न्तासी !!

गुरुसी जाणणे ! अगदीच सोपे !
गुरु ज्ञान दीपे ! ब्रम्हा परी !!

मुळ  ज्ञानवंत ! नाच शोभिवंत !
जाग जाणिवांत ! जागलेला !!

भावना तयाची ! ज्ञान रुजवावे !
ज्ञान हे वाटावे ! अखंडित !!

गुरूची संगत ! अंगुली जागृत !
सोडूनी विकृत ! हिंसाचार !!

गुरु वाट तुझी ! सत्यार्थ दावितो !
ना कधी दावितो ! असत्याची !!

गुरु हा असावा ! आरशाप्रमाणे !
दाविल्या प्रमाणे ! बा... दिसावे !!

पळसा प्रमाणे  ! असो कीर्तीरूप !
दावी आशारूप ! संकटात !!

-प्रवीण (डेबुजी) हटकर.