Saturday, 25 May 2013

श्री समर्थ गुरु …

शेगावी आगर  ! आनंद बहर !
उमटले स्वर ! गजानन !!

शेगावीचा राणा ! त्याचा एकी बाणा !
मंत्र एकी जाणा ! एकतेचा !!

स्वामी ब्रम्हरूप ! जना एकरूप !
समर्थ स्वरूप ! चराचरी !!

पांडुरंग दिसे ! बा… गोसावी दिसे !
रूप तुझे दिसे ! भक्तजना !!

स्वामी गजानन ! जय गजानन !
 बाबा गजानन ! नमो नम: !!

श्री समर्थ गुरु ! नाम तुझ्या सुरु !
मार्ग तुझा धरू ! सदाचारी !!

जागुया समर्थ ! जाणुया समर्थ !
लाभे परमार्थ ! भजताना !!

प्रवीण भजता ! अंतरी स्वानंद !
बा… परमानंद ! लाभतोया !!
 (अभंग … )
-प्रवीण बाबूलाल हटकर
 

Friday, 24 May 2013

हे विश्व प्रकाशाय…

सूर्य तेजाय नम: ! सूर्य देवाय नम: !
बा… सुर्यात्माय  नम: ! नमो नम: !!

अंधार विनाशाय ! गा… सृष्ठी प्रकाशाय !
 हे उर्जा प्रदानाय ! नमो नम: !

देवा सुर्योदयाय  ! ऑं प्रभू सुर्यास्थाय !
उदयाय अस्थाय ! नमोनम: !!

 देवा दिनकराय ! बा…  प्रभू भास्कराय !
स्वामी दिव्य तेजाय ! नमो नम: !!

प्रभू ! देवाधिदेवा ! स्वामी रवीकान्ताय !
तेजस्वी किरनाय ! नमो नम: !!

अंधार कालाय ! दिव्य तेज उर्जाय !
धरणी प्रकाशाय ! नमोनम: !!

जीव जंतू नाशाय !   बा…  उर्जा प्रदानाय !
सजीव चेतनाय ! नमोनम: !!

 गा … प्रवीण नमन ! हे विश्व प्रकाशाय !
प्रभू सूर्य देवाय !! नमोनम: !!

( अभंग … )
-प्रवीण बाबूलाल हटकर .

Monday, 20 May 2013

श्वास माझा विठू …

श्वास माझा विठू !
प्राण माझा विठू !
स्पंदनात विठू !
वाहतोया !!

कणातही विठू !
ब्रम्हांडात विठू !
चराचरी विठू !
राहतोया !!

सत्य कर्म विठू !
सत्य मर्म विठू !
सत्य धर्म विठू !
पाळतोया !!

काम माझे विठू !
ध्येय  माझे विठू !
तुझ्या  नाम विठू !
गाठतोया !!

माय माझी विठू !
बाप माझा विठू !
नमो नम: विठू !
वंदतोया !!

जागतोया विठू !
जाणतोया विठू !
अंतरित विठू !
भजतोया !!

विठू विठू विठू !
पांडुरंग विठू !
नाम घेण्या विठू !
हो प्रवीण !!

रंगू नाम विठू !
दंगु नाम विठू !
एक नाम विठू !
स्वानंदुया !!

(अभंग … )
-प्रवीण बाबूलाल हटकर .

Saturday, 18 May 2013

योग वियोग व योगायोग …
 (अभंग )
योग वियोग व ! योगायोग पाहू !
संदर्भात राहू ! सहज हो !!

बा… घडून येतो ! घडवून होतो !
संघटीत होतो ! तोचि योग !!

भक्त हनुमान ! प्रभू रामचंद्र !
बा… योग स्वानंद ! परमोच्च !!

श्री. कृष्ण सुदामा ! घडवून योग !
आनंद संजोग ! बा… भेटीचा !

सुख समाधान ! उद्देश मिलन !
योग संघटन ! प्राप्तीतून !!

वियोग उलट ! विघटन होतो !
बा… दुरावा होतो ! योगातून !

दुख दाहकता ! विरह यातना !
वियोग वेदना ! दुराव्यात !!

पहा रामसीता ! वियोग जाहला !
दाहक पाहिला ! बा… दुरावा !!

वनवासी गेले ! सोबत लक्ष्मण !
उर्मिलेचे मन ! वियोगले !!

आकांत आक्रोश ! वियोगात येता !
सुख शांती येता ! योगातून !!

योग नी वियोग ! दोन बाजू आहे !
समाविष्ट आहे ! योगायोगी !!

योग नी वियोगी ! घडले प्रसंगी !
योगायोग संगी ! दोन्ही बाजू !!

प्रवीण प्रयोग !समजू…  वियोग !
योग योगायोग ! बा… अभंगी !!

- प्रवीण बाबूलाल हटकर 


Monday, 6 May 2013

       कता

तू गझलेची देणी मला
तूच अजिंठा लेणी मला


ओघळणारा नयन-अश्रू
माझ्या अधरी घेणी मला…

-प्रवीण बाबूलाल हटकर 
जाणुया चेतन ! आणि अचेतन !
मनात जतन ! करुनिया !!

चेतनेची व्याप्ती ! जाणीवेत आहे !
संवेदना आहे ! जया अंगी !!

सजीव जो आहे ! जो जागलेला आहे !
जाणीवांत आहे ! तो चेतन !!

कृष्ण बुद्ध येशु ! संवेदन आहे !
जाणीवांत आहे ! बा… चेतन !!

प्रत्तेक घटना ! परिणाम तया !
जवळून जया ! जाणलेला !!

अचेतन आहे ! जो निर्जीव आहे !
असमर्थ  आहे ! जाणण्याशी !!

घटना जाणण्या !  आहे असक्षम !
शून्य परिणाम ! अचेतना !!

बा… मृत्य समयी ! जीव अचेतन !
गा … जन्मी चेतन ! जीव होतो !!

होत संवेदना ! चेतन प्रतिक !
अचेतन ठीक ! या उलट !!

विचार सक्षम ! चेतन प्रभाव !
विचार अभाव ! अचेतन !!


Thursday, 2 May 2013

चिता, चिंता, आणि  चिंतन….               
                  
           अभंग
चिता, चिंता, आणि ! चिंतन जाणुया !
भावार्थ पाहुया ! तिघांतला !!

चिता ही जाळते ! अंतिम समयी !
मृत्युच्या समयी ! अखेरीस !!

चिता ही जळते ! शेवट जीवन !
चिंता नी चिंतन ! नष्ट सारे !!

चिंता ही जाळते ! जसे क्षणो-क्षणी !
दुख्खास जीवनी ! भोगतांना !!

विरह वेदना ! दुख नी दुरावा !
अखंड पुरावा ! बा… चिंतेचा !!

चिता ही जाळते ! अंती जळताना !
चिंता ही जाळते ! क्षणोक्षणी !!

चिंतन करतो ! विचार करून !
सुयोग्य करून ! विचार हो !!

चिंतन करुया  ! मनन करूया  !
गा… नष्ट करूया  ! चिंतेस हो !!

जीव होतो नष्ट ! सत्य हे त्रिकाली !
चिंता ही अकाली ! येणे-जाणे !!

चितेस न रोकु  ! रोकु चिंतेस हो !
करू चिंतन हो ! अविरत  !!

चिंतन करता ! मिळतो स्वानंद !
बा… परमानंद ! जीवनाला !!

- प्रवीण बा. हटकर

Wednesday, 1 May 2013

अंतरंग ...

                 अभंग...

पांडुरंग पांडुरंग ! नाम तुझे घेता दंग!
जीवनाला सप्तरंग ! लाभलेया !!

दर्शनाची तळमळ ! वारकरी धावपळ !
भाव अंतरी निर्मळ ! प्रसवले !!

विठू मज दिसतोय! गालामध्ये हसतोय!
नजरेला दावतोय! दिव्य रूप !!

विठ्ठल नामात दंग! प्रवीण रचे अभंग!
उधळून अंतरंग! चराचरी !!

-प्रवीण बाबूलाल हटकर.