चिता, चिंता, आणि चिंतन….
अभंग
चिता, चिंता, आणि ! चिंतन जाणुया !
भावार्थ पाहुया ! तिघांतला !!
चिता ही जाळते ! अंतिम समयी !
मृत्युच्या समयी ! अखेरीस !!
चिता ही जळते ! शेवट जीवन !
चिंता नी चिंतन ! नष्ट सारे !!
चिंता ही जाळते ! जसे क्षणो-क्षणी !
दुख्खास जीवनी ! भोगतांना !!
विरह वेदना ! दुख नी दुरावा !
अखंड पुरावा ! बा… चिंतेचा !!
चिता ही जाळते ! अंती जळताना !
चिंता ही जाळते ! क्षणोक्षणी !!
चिंतन करतो ! विचार करून !
सुयोग्य करून ! विचार हो !!
चिंतन करुया ! मनन करूया !
गा… नष्ट करूया ! चिंतेस हो !!
जीव होतो नष्ट ! सत्य हे त्रिकाली !
चिंता ही अकाली ! येणे-जाणे !!
चितेस न रोकु ! रोकु चिंतेस हो !
करू चिंतन हो ! अविरत !!
चिंतन करता ! मिळतो स्वानंद !
बा… परमानंद ! जीवनाला !!
- प्रवीण बा. हटकर
अभंग
चिता, चिंता, आणि ! चिंतन जाणुया !
भावार्थ पाहुया ! तिघांतला !!
चिता ही जाळते ! अंतिम समयी !
मृत्युच्या समयी ! अखेरीस !!
चिता ही जळते ! शेवट जीवन !
चिंता नी चिंतन ! नष्ट सारे !!
चिंता ही जाळते ! जसे क्षणो-क्षणी !
दुख्खास जीवनी ! भोगतांना !!
विरह वेदना ! दुख नी दुरावा !
अखंड पुरावा ! बा… चिंतेचा !!
चिता ही जाळते ! अंती जळताना !
चिंता ही जाळते ! क्षणोक्षणी !!
चिंतन करतो ! विचार करून !
सुयोग्य करून ! विचार हो !!
चिंतन करुया ! मनन करूया !
गा… नष्ट करूया ! चिंतेस हो !!
जीव होतो नष्ट ! सत्य हे त्रिकाली !
चिंता ही अकाली ! येणे-जाणे !!
चितेस न रोकु ! रोकु चिंतेस हो !
करू चिंतन हो ! अविरत !!
चिंतन करता ! मिळतो स्वानंद !
बा… परमानंद ! जीवनाला !!
- प्रवीण बा. हटकर
No comments:
Post a Comment