योग वियोग व योगायोग …
(अभंग )
योग वियोग व ! योगायोग पाहू !
(अभंग )
योग वियोग व ! योगायोग पाहू !
संदर्भात राहू ! सहज हो !!
बा… घडून येतो ! घडवून होतो !
संघटीत होतो ! तोचि योग !!
भक्त हनुमान ! प्रभू रामचंद्र !
बा… योग स्वानंद ! परमोच्च !!
श्री. कृष्ण सुदामा ! घडवून योग !
आनंद संजोग ! बा… भेटीचा !
सुख समाधान ! उद्देश मिलन !
योग संघटन ! प्राप्तीतून !!
वियोग उलट ! विघटन होतो !
बा… दुरावा होतो ! योगातून !
दुख दाहकता ! विरह यातना !
वियोग वेदना ! दुराव्यात !!
पहा रामसीता ! वियोग जाहला !
दाहक पाहिला ! बा… दुरावा !!
वनवासी गेले ! सोबत लक्ष्मण !
उर्मिलेचे मन ! वियोगले !!
आकांत आक्रोश ! वियोगात येता !
सुख शांती येता ! योगातून !!
योग नी वियोग ! दोन बाजू आहे !
समाविष्ट आहे ! योगायोगी !!
योग नी वियोगी ! घडले प्रसंगी !
योगायोग संगी ! दोन्ही बाजू !!
प्रवीण प्रयोग !समजू… वियोग !
योग योगायोग ! बा… अभंगी !!
- प्रवीण बाबूलाल हटकर
No comments:
Post a Comment