Monday, 6 May 2013

जाणुया चेतन ! आणि अचेतन !
मनात जतन ! करुनिया !!

चेतनेची व्याप्ती ! जाणीवेत आहे !
संवेदना आहे ! जया अंगी !!

सजीव जो आहे ! जो जागलेला आहे !
जाणीवांत आहे ! तो चेतन !!

कृष्ण बुद्ध येशु ! संवेदन आहे !
जाणीवांत आहे ! बा… चेतन !!

प्रत्तेक घटना ! परिणाम तया !
जवळून जया ! जाणलेला !!

अचेतन आहे ! जो निर्जीव आहे !
असमर्थ  आहे ! जाणण्याशी !!

घटना जाणण्या !  आहे असक्षम !
शून्य परिणाम ! अचेतना !!

बा… मृत्य समयी ! जीव अचेतन !
गा … जन्मी चेतन ! जीव होतो !!

होत संवेदना ! चेतन प्रतिक !
अचेतन ठीक ! या उलट !!

विचार सक्षम ! चेतन प्रभाव !
विचार अभाव ! अचेतन !!


No comments:

Post a Comment