संदेश करिती, अपुले नेतृत्व …
बा… संदेश आहे ! आम्हा उपयोगी !
जानुया प्रयोगी ! सहजच !!
संदेशवहन ! मिळे प्रत्येकात !
कण-ब्रम्हांडात ! व्यापियले !!
सजीव निर्जीव ! दृश्य अदृश्यात !
हरेका जीवात ! बा… संदेश !
गा… संदेश भाव ! सकारात्मकता !
नकारात्मकता ! उद्देशती !!
पशू, पक्षी ह्यांच्या ! हालचाली, कृती !
निसर्ग प्रकृती ! संदेशच !!
धर्म व संस्कृती ! चाली आणि रिती !
बा… नियम, नीती ! संदेश हो !!
संदेश महत्व ! उद्देश सांगती !
संदेश उत्पती ! भाव देई !!
संदेश वहन ! हवे सदाचारी !
नको दुराचारी ! अविचारी !!
चालता बोलता ! हसता रडता !
कृती करताना ! होई बोध !
हरेका बोधात ! बा … संदेश आहे !
नी उद्देश आहे ! प्रमाणित !!
येशु संवेदन ! कृष्ण प्रेमरूप !
संदेश स्वरूप ! दिले आहे !!
बोद्ध शांतीसाठी ! बा… विवेकानंद !
संदेश स्वानंद ! ज्ञानासाठी !!
प्रवीण उद्देश ! संदेश सुयोग्य !
नसावा अयोग्य ! कृतीतून !!
संदेश करिती ! अपुले नेतृत्व !
नी प्रतिनिधत्व ! विचारांचे !!
संदेशचा अर्थ ! भाव मनातील !
कृतीत येतील ! उद्देशातून !!
-प्रवीण बाबूलाल हटकर