विठ्ठल मोकळा श्वास …
विठ्ठल मोकळा श्वास ! विठ्ठल धुंद सुवास !
विठ्ठल मुक्त प्रवास ! जीवनाचा !!
विठू नाम समाधान ! विठू एकचित्त ध्यान !
विठू अमुचा प्रधान ! स्वाभिमान !!
विठ्ठल बेधुंद वारा ! विठू आसमंत सारा !
बा… प्रकाशमयी तारा !! भक्तासाठी !!
विठू अमुचा प्रमुख ! विठू अमुचा ठाकूर !
बा… अमुचा शिल्पकार ! पांडुरंग !!
विठ्ठल विठ्ठल हरी ! हरी हरी पांडुरंग !
भक्त गण दंग दंग ! नाम हरी !!
(अभंग … )
-प्रवीण बाबूलाल हटकर
विठ्ठल मोकळा श्वास ! विठ्ठल धुंद सुवास !
विठ्ठल मुक्त प्रवास ! जीवनाचा !!
विठू नाम समाधान ! विठू एकचित्त ध्यान !
विठू अमुचा प्रधान ! स्वाभिमान !!
विठ्ठल बेधुंद वारा ! विठू आसमंत सारा !
बा… प्रकाशमयी तारा !! भक्तासाठी !!
विठू अमुचा प्रमुख ! विठू अमुचा ठाकूर !
बा… अमुचा शिल्पकार ! पांडुरंग !!
विठ्ठल विठ्ठल हरी ! हरी हरी पांडुरंग !
भक्त गण दंग दंग ! नाम हरी !!
(अभंग … )
-प्रवीण बाबूलाल हटकर
No comments:
Post a Comment