Monday, 16 December 2013

तुझ्या जाणीवांत, तू उतर…


जे ते आहे येथे ! आगळे वेगळे !
ना आहे सगळे ! एक सम !!

कासवाची चाल ! हळुवार आहे !
बा… कठीण आहे !  पाठीवर !!

परिस दिसतो ! जसा तो दगड !
स्पर्शता लोखंड ! होई सोने !!

हरेकात आहे ! बा… वेगळेपण !
ओळखावे गुण ! स्व: आंतरी !!

सरपट चाल ! नागराज करी !
बा… खेकडा करी ! पायखेच !!

गांडूळ जमीन ! सुपीक करितो !
नेत्रास भासतो ! गा… लहान !!

फुलात सुवास ! काट्याचे बोचणे !
त्यारूप असणे !गुणधर्म !!

कोणी शक्तिरूप ! कोणी भक्तिरूप !
कोणी उक्तिरूप ! बा… असता !!

हरेक सामान्य ! त्यात असामान्य !
बा… गुण प्राविण्य ! दडलेत !!

बगळा हा धूर्त ! कोल्हा हा लबाळ !
तै झाली ओळख ! बा… स्वभावी !!

एकसंघ काम ! मुंग्या शिकविती !
एकीचे दाविती ! बळ सर्वा !!

वेगळेपण ही ! स्वतंत्र ओळख !
जीवन ओळख ! बा… होण्यास !!

चाणक्य नीतीही ! अत्यंत कुटील !
त्यासम कुटील ! ना चतुर !!

अश्यू बोद्ध जणू ! शांतीचे प्रतिक !
प्रेमाचे प्रतिक ! वासुदेव !!

मानवा तू आहे ! खरा बुद्धिवंत !
तुझ्या जाणीवांत ! तू उतर !!

भावना प्रधान ! संवेदन मन !
प्राप्त हे जीवन ! वेगळेची !!

(अभंग … )
-प्रवीण बाबूलाल हटकर. 

No comments:

Post a Comment