Tuesday, 3 December 2013

"काळोखी एकांताचा कल्लोळ" …

अंधार पसरत चाललाय,
सर्वजग काळोखमय झालय,
पुढे-मागे, आजूबाजूने अंधारच अंधार… 
निशब्ध, स्तब्ध बेसावध अंतरित 
अचानक ! अशांत बेधुंद काळोखी वारे
बेरंगी भयास, मनरूपी घरट्यात जागा देतात. 
मग सुरु होतो "काळोखी एकांताचा कल्लोळ" … 
संवेदन शांत मनात भयचा तांडव सुरु होतो. 
'मन-नटरंग' उलटा नाच नाचू लागतं नी आक्रोश करू लागतं. 
जणू मनातल्या मनात आसुरी काळोखाने
घट्ट गळा दाबलाय शांततेचा 
नी ओरबाळून काढली आहे अन्ननलिका
अखेरच्या 'श्वासासह'… 
तितक्यात एका धाडसी विचारासह भयाच्या 
अंधारमय खोल-खोल तीमिराच्या खायीत
कवडस्यातून एक किरण गतीने येतो,
हजारो, लाख्खो काळोखी भयमय असुरांचा वध करत  
त्यांना चिरत-चिरत पुन्हा आपल्या प्रकाशरूपी साम्राज्याला
प्रस्तापित करताना, अगदी सहजच … 
ह्या तेजोमय, दिपोमय, यशोमय व कीर्तिमय दिव्यश्या अफाट,
अदभूत, प्रकाशास… सलाम !! सलाम !! सलाम !!

-प्रवीण बाबूलाल हटकर 

No comments:

Post a Comment