गुरुविना मार्ग ! कसा मिळे?
शिकवण जगी ! जेथे मिळे !!
गुरु देई ज्ञान ! सगळ्यासी एक !
बा… घेई हरेक ! त्यास्वरूप !!
गुरु समरूप ! जो असे जितका !
ज्ञानार्थ तितका ! त्यासी मिळे !!
गुरुचा आदर ! अंतरी असावा !
वरती नसावा ! बा… देखावा !!
द्रोणाचार्य शिश्य ! बा… अनेक होती !
अर्जुनासी होती ! ना… कुणीही !!
अर्जुनासी होती ! ना… कुणीही !!
एकलव्य बघा ! मूर्तीस पुजून !
बा… लीन होवून ! ज्ञानी झाला !!
गुरु एकरूप ! गुरु समरूप !
ज्ञानार्थ स्वरूप ! त्यासी मिळे !!
गुरु ज्ञानबोध ! बा… ज्यासी होईल !
कल्याण होयील ! जगी तया !!
गुरु वर ज्याचा ! विश्वास असेल !
ज्ञान हे मिळेल ! आशीर्वादी !!
गुरूची मस्करी ! ज्ञान व्यर्थ होई !
ज्ञानार्थ ना होई ! आकलनी !!
आई गुरु होता ! शिवाजी घडले !
आम्हास कळले ! हो ! स्वराज्य !!
सुरवात केली ! महिला शिक्षण !
देत शिकवण ! सावित्रीसी !!
गुरूची महती ! गुरूची संगती !
मिळे ज्ञान गती ! जीवनाला !!
ध्येयाविना लक्ष ! मोक्षाविना स्वर्ग !
गुरुविना मार्ग ! कसा मिळे? !!
(अभंग … )
-प्रवीण बाबूलाल हटकर