जीवन म्हणजे ! संकटी बुरुज !
हरेका खरुज ! जीवनाला !!
संकट करती ! संघर्षा प्रवृत्त !
संकटा निवृत्त ! करण्यासी !!
संकट म्हणजे ! समस्यांचा डोह !
मधमाशी मोह ! चावतोया !!
संकटी वादळे ! समस्यांचा पूर !
भयाचे आसुर ! बा… आणती !!
गा… अशात त्रासु ! नये… खचू नये !
आत्मजान नये ! हरवूया !!
निर्भीड जयाचा ! आत्मस्तम्भ आहे !
समस्यांचे आहे ! पलायन !!
विचार सक्षम ! प्रचंड विश्वास !
संकटी प्रवास ! बा… सहज !
हरेका संकटा ! मागे आहे मार्ग !
मिळतोया स्वर्ग ! शोध घेता !!
समस्याही आहे ! निवारण आहे !
मनगटी आहे ! जोर ज्याच्या !!
मन स्थैर्य आहे ! निर्भीड जो आहे !
सक्षम तो आहे ! तोंड देण्या !!
संकटी शिकार ! होण्या पूर्वी कर!
निर्भीड शिकार ! संकटांची
अभंग
-प्रवीण बाबूलाल हटकर
-प्रवीण बाबूलाल हटकर
No comments:
Post a Comment