Wednesday, 29 January 2014

मजला आधार ! विठू नाम

प्राणवायू हवा ! जीव जगण्यासी !
जीवा जगण्यासी ! विठू नाम !!

अकर्म नष्टती ! सकर्म उदयी !
सकर्म उदयी ! विठू नाम !!

होई सत्य कर्म ! होई सत्य धर्म !
सत्य कर्म धर्म ! विठू नाम !!

दिन दुबळ्यासी ! बा… सेवा अर्पावी  !
नी मुखी वंदावी ! श्री वचने !!

वटवृक्ष जसा ! वेलीस आधार !
मजला आधार ! विठू नाम !!

(अभंग … )
-प्रवीण बाबूलाल हटकर 

No comments:

Post a Comment