ओळख पाहिजे ! जाणीव पाहिजे !
कुणी बोले मज ! तू तसे वागावे !
तू तसे असावे ! त्या स्वरूप !!
अस्तित्व पाहिजे ! "स्व"
ताहाचे !!
ताहाचे !!
मी वागतो आहे ! ज्यासी हवा तसा !
पुसूनीया ठसा ! स्वताहाचा !!
जाणिले तयांनी ! हवा त्या स्वरूप !
भेटलो त्या रूप ! सहज त्या !!
कुणी बोले मज ! तू तसे वागावे !
तू तसे असावे ! त्या स्वरूप !!
अस्तित्व हवे ते ! फिनिक्सा प्रमाणे !
फिनिक्सा प्रमाणे ! जगावेत !!
स्व राखेतूनिया ! जन्म घेई असा !
ना कोणीही तसा ! त्या स्वरूप !!
फिनिक्स ओळख ! स्व राखेत जन्म !
जमले आजन्म ! ना कोणास !!
कमळ जन्मतो ! चिखल जागेत !
सुंदर जगात ! ना त्या रूप !!
राणी लक्ष्मीबाई ! रे अहिल्या शूर !
अंतराळ वीर ! सुनिता तू !!
शिवाजीसारखा ! पराक्रमीच ना !!
चाणक्या सारखा ! ना कुटील !!
प्रेम कृष्णरूप ! शांती बुद्धारूप !
बा … विवेकरूप ! ज्ञानसाठा !!
आगळी वेगळी ! प्रतिमा जयांची !
कीर्ती हो तयांची ! स्व बळाची !!
स्व ओळख दावी ! अस्तित्वाची जान !
कीर्ती हि प्रमाण ! विश्वरूपी !!
- प्रवीण बाबूलाल हटकर
अंतराळ वीर ! सुनिता तू !!
शिवाजीसारखा ! पराक्रमीच ना !!
चाणक्या सारखा ! ना कुटील !!
प्रेम कृष्णरूप ! शांती बुद्धारूप !
बा … विवेकरूप ! ज्ञानसाठा !!
आगळी वेगळी ! प्रतिमा जयांची !
कीर्ती हो तयांची ! स्व बळाची !!
स्व ओळख दावी ! अस्तित्वाची जान !
कीर्ती हि प्रमाण ! विश्वरूपी !!
- प्रवीण बाबूलाल हटकर
No comments:
Post a Comment