भूत,वर्तमान,भविष्य …
जाणुया भविष्य ! भूत वर्तमान !
जाणुया भविष्य ! भूत वर्तमान !
काळ आहे तीन ! जगण्याचे !!
भूतकाळ जसा ! घडून गेलाय !
मात्र उरलाय ! आठवांत !!
बा… कडू वा गोड ! भूतकाळ असो !
गुंतलेला नसो ! सदोदित !!
भूतकाळ असो ! अनुभव साठा !
वर्तमानी तोटा ! ना होयील !!
वर्तमानी आहे ! सध्या चालू स्थिती !
कार्य काळ नीती ! राखण्याची !!
वर्तमानी कार्य ! बा… जे जे होयील !
भविष्या मिळेल ! फळ ते ते !!
ना देखिले ऐसे ! पेरले दुसरे !
मिळाले तिसरे ! आजवर !!
बा… काटे पेरता ! फुल ना मिळेल !
काटेच मिळेल ! नियम हा !!
भविष्य म्हणजे ! जे होणार आहे !
होत काळा आहे ! पूढे तोचि !!
उत्तम भविष्य ! जगतो आपण !
भूत, वर्तमान ! कार्यातून !!
भूतकाळ असो ! अनुभवपूर्ण !
असो कार्यपूर्ण ! वर्तमान !!
प्रवीण भविष्य ! साकार झालेया !
वर्तमानी केल्या ! कार्यातुनी !!
(अभनग… )
-प्रवीण बाबूलाल हटकर
होत काळा आहे ! पूढे तोचि !!
उत्तम भविष्य ! जगतो आपण !
भूत, वर्तमान ! कार्यातून !!
भूतकाळ असो ! अनुभवपूर्ण !
असो कार्यपूर्ण ! वर्तमान !!
प्रवीण भविष्य ! साकार झालेया !
वर्तमानी केल्या ! कार्यातुनी !!
(अभनग… )
-प्रवीण बाबूलाल हटकर