Thursday, 19 September 2013

विचार …


विचारातील  दानव  …
अपुल्या विचारमयि सागरात 
गढूळतेचे काम करतात …
मग काम मत्सर भेदभाव क्रूर भावनाचे हलाहल 
उठते नि   विचारातील  देवाला… विषमय करण्याचा प्रयास करतात 
न चुकता … अगदी राजरोस 
पण 
विचारातील देव… 
हा गीता बायबल  कुराण धम्म धर्म ग्रंथसागरातील 
अमृतमय विचारांनी सत्यार्थ पवित्र असल्यास 
दानव विचारातील मलीनता दूर करतात 
 … अगदी सहजच … 
तात्पर्य …
वाल्याचा वाल्मिकी व अंगुलीमाल  यांचे दानवरूपी विचार
सकारात्मक देवरूपी विचारात विलीन झालेच ना …

-प्रवीण बाबूलाल हटकर 

No comments:

Post a Comment